सिव्हिल लाईन भागाचा उद्या पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:08 AM2021-03-31T04:08:45+5:302021-03-31T04:08:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी सिव्हिल लाईन मुख्य वाहिनीवर आंतरजोडणी करण्याचा निर्णय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी सिव्हिल लाईन मुख्य वाहिनीवर आंतरजोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १२ तासांचा शटडाऊन घ्यावा लागणार आहे. हे आंतरजोडणी काम उद्या गुरुवारी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान केले जाईल. या कालावधीत सिव्हिल लाईन भागातील पाणीपुरवठा बंद राहील.
बाधित राहणारे भाग
धरमपेठ झोन : वाकर्स रोड, उदयनगर, विजयनगर, रविभवन, आनंदनगर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिसर, विधानभवन, महापालिका कार्यालय परिसर, मरियमनगर, विदर्भ नाग चेम्बर्स, किनखेडे ले-आऊट, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त निवास, दामोधर ले-आऊट, करोडपती ले-आऊट, जीपीओ चौक, गृहमंत्री निवास, राजाराणी चौक, आयुक्त कार्यालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि परिसर, हिस्लॉप कॉलेज, मुख्यमंत्री निवास, निवासी जिल्हाधिकारी कॉलनी, सिरिया कॉलनी, मीठानीम दर्गा, इरिगेशन कॉलनी आणि लॉ कॉलेज कॉलेज परिसर.