जलवाहिनी फुटली; नागपुरातील 'या' भागात आज पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 02:15 PM2022-06-01T14:15:31+5:302022-06-01T14:18:44+5:30
जलवाहिनी प्रजापती चौकात फुटल्याने महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतली आहे.
नागपूर : कन्हान जलशुद्धीकरण ते भांडेवाडी, पारडी १, २ आणि सुभान नगर जलकुंभांना जोडणारी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी प्रजापती चौकात फुटल्याने महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतली आहे. यासाठी शटडाऊन घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने चार जलकुंभांवरून बुधवारी पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारे जलकुंभ
सुभान नगर जलकुंभ : साई नगर, नेताजी नगर, सुभान नगर, भारत नगर, गुजरात कॉलनी म्हाडा कॉलनी, शिक्षक कॉलनी, गुलमोहर नगर, तळमळे ले -आउट, चंद्र नगर, जुनी पार्डी, मंगलदीप कॉलनी ओम नगर, दुर्गा नगर, महादेव नगर, आभा कॉलनी, लक्ष्मीनगर, पुष्पक सोसायटी.
पारडी १ जलकुंभ : आंबे नगर, स्वागत नगर, सुंदर नगर, शेंडे नगर, हनुमान नगर, विनोबा भावे नगर, खाटीक पुरा, महाजन पुरा, गोंदपुरा आणि गजानन मंदिर परिसर.
पारडी २ जलकुंभ : नवीन नगर, श्याम नगर, तालपुरा , राम मंदिर रोड , शनि मंदिर परिसर, भवानी नगर, करणारे नगर, भोलेश्वर सोसायटी, पुनापूर आणि भारत वाडा
भांडेवाडी जलकुंभ : महादेश नगर, श्रावण नगर, राज नगर, वैष्णोदेवी नगर, पावन शक्ती नगर, चंद्रमणी नगर, मेहर नगर, कोंडवानी टाऊन सर्जू टाऊन, धरती मॉ सोसायटी, अंतुजी नगर अबूमिया नगर, तुलसी नगर व राज नगर.