सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:10+5:302021-08-27T04:12:10+5:30
काही वस्त्यांतील नागरिक त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फुटाळा तलाव परिसरात महामेट्रोचे काम करताना सोमवारी रात्री ५०० ...
काही वस्त्यांतील नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळा तलाव परिसरात महामेट्रोचे काम करताना सोमवारी रात्री ५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे मंगळवारपासून शहरातील काही वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाले आहे. परंतु शुक्रवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळी नागरिकांना पाणी मिळणार नाही. यात जुना फुटाला, नवीन फुटाला, संजय नगर वसाहत, सुदाम नागरी पंकज नगर, हिंदुस्थान कॉलनी, धोबी घाट आदी वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली.
...
तीन दिवस पाणी मिळाले नाही
गोरेवाडा येथील पेंच-२ आणि पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र येथून निघणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील अंतर्गत दुरुस्तीमुळे मंगळवार ते गुरुवार दरम्यान सहा झोनमधील २५ जलकुंभांचा पाणीपुरवठा बंद होता. यामुळे शंभराहून अधिक वस्त्यांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक कारणामुळे दुरुस्तीला विलंब झाल्याने २४ तासांचे शटडाऊन ८ तासांनी लांबले. यामुळे शुक्रवारी सकाळी या जलकुंभांचा पाणीपुरवठा सुरू झाला. यादरम्यान टँकरने पाणीपुरवठा न झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक भटकत होते. आता पाणीपुरवठा सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.