दिघोरी व रेशीमबाग जलकुंभावरून उद्या पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:35+5:302020-12-04T04:21:35+5:30
नागपूर : नागपूर महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी दिघोरी जलकुंभाच्या आऊटलेटवर फ्लो मीटर बसविण्याच्या व इतर काही देखरेखीच्या ...
नागपूर : नागपूर महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी दिघोरी जलकुंभाच्या आऊटलेटवर फ्लो मीटर बसविण्याच्या व इतर काही देखरेखीच्या कामांसाठी उद्या शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान १२ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. याकालावधीत जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार नाही.
शटडाऊनमुळे सर्वश्री नगर, वैभव नगर, कीर्ती नगर, टेलिफोन नगर, बेलदार नगर, संत तुकडोजी नगर, महानंदा नगर, आझाद कॉलनी, दिघोरी, रामकृष्ण नगरआदी वस्त्यांना पाणी पुरवठा होणार नाही.
या दरम्यान रेशीमबाग जलकुंभाची स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे ओम नगर, सुदामपुरी, आनंद नगर, नेहरू नगर, महावीर नगर, शिव नगर, जुने नंदनवन, भगत कॉलनी, गायत्री नगर, गणेश नगर, जुनी शुक्रवारी, लभान तांडा आदी वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद राहील. टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने पुरेसा पाणीसाठा करावा, असे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे.