नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान नदीला पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:47 PM2020-05-18T21:47:46+5:302020-05-18T21:50:02+5:30
कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार करता नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान नदीत ७० दलघमी पाणी सोडण्पाला सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार करता नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान नदीत ७० दलघमी पाणी सोडण्पाला सुरूवात केली आहे.
शहरात काही भागात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने सोमवारी कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी कन्हान येथील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी समस्येमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जलसंपदा विभागाशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार नवेगाव खैरी येथील जलाशयातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्यात आले आहे. नवेगाव खैरी ते कन्हान नदी असा ४४ किमी अंतराचा प्रवाह असून कन्हान नदीत ते पाणी पोहोचायला ४८ तासाचा कालावधी लागणार आहे. नवेगाव खैरी येथून करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यामुळे लवकरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.