सव्वाशेहून अधिक वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:50+5:302021-08-18T04:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या गोधनी पेंच- ४ जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा मंगळवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या गोधनी पेंच- ४ जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून खंडित झाल्यामुळे ८ जलकुंभावरून पाणी पुरवठा बंद राहिला. यामुळे शहरातील १२५ हून अधिक वस्त्यांचा पाणी पुरवठा बाधित झाला आहे, तसेच बुधवारी सकाळी पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता ओसीडब्ल्यूने वर्तवली आहे.
उशिरा रात्रीपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य युद्ध स्तरावर सुरू होते; परंतु पावसामुळे दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येत असल्याने बुधवारी सकाळी पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. या अचानक झालेल्या पाॅवर ब्रेकडाऊनमुळे आशी नगर, लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर व नेहरू नगर झोनमधील ८ जलकुंभांचा पाणी पुरवठा बंद झाला. यात नारा नारी, जरीपटका (आशी नगर झोन), धंतोली (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर जुने, नवे, म्हाळगी नगर (हनुमान नगर झोन), तसेच हुडकेश्वर व नरसाळा गाव. आदी जलकुंभावरून पाणी पुरवठा बाधित झाला आहे.