सक्करदरा १ आणि सक्करदरा २ जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित
By मंगेश व्यवहारे | Updated: October 4, 2023 22:01 IST2023-10-04T22:01:24+5:302023-10-04T22:01:42+5:30
गुरुवारीही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बाधित राहण्याची शक्यता आहे.

सक्करदरा १ आणि सक्करदरा २ जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित
मंगेश व्यवहारे, नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत ४०० एमएम व्यासाची मुख्य जलवाहिनी व्यंकटेश सभागृह सक्करदरा जलकुंभाजवळ क्षतिग्रस्त झाली आहे. या जलवाहिनीला झालेल्या क्षतीला दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरू केले आहे. त्यामुळे नेहरूनगर झोनअंतर्गत सक्करदरा १ आणि सक्करदरा २ जलकुंभाचा पाणीपुरवठा बुधवारी बाधित राहिला.
गुरुवारीही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बाधित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहरूनगर झोनमधील अयोध्यानगर, कैलासनगर, दुर्गानगर, शिर्डी सिटी, जुना सुभेदार, बँक कॉलनी, जम्मूदीपनगर, अंबिकानगर, श्रीराम वाडी आरएमएस कॉलनी, इंदिरा गांधीनगर, गवळीपुरा, सेवादलनगर, राणी भोसलेनगर, भांडेप्लॉट, जवाहरनगर, बँक कॉलनी, चक्रधरनगर, लाडीकर लेआऊट, महालक्ष्मीनगर- १, २, ३ येथे पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.