तीन जलकुंभाचा पाणीपुरवठा आणखी दोन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:17+5:302021-03-13T04:11:17+5:30
जलवाहिनी फुटली : आधिच चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय महामार्ग ६ वर चौपदरी उड्डाणपूल ...
जलवाहिनी फुटली : आधिच चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग ६ वर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. याचाच भाग म्हणून युटीलिटी शिफ्टिंगअंतर्गत या कामासाठी २४ तासाचा शटडाऊन घेण्यात आला होता. यामुळे चार दिवसांपासून पारडी व भांडेवाडी जलकुंभांचा पाणीपुरवठा बंद होता. चार दिवसांनंतरही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी मनपाच्या लकडगंज झोन कार्यालयाला कुलूप ठोकले होते. गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार मात्र ज्या ठिकाणी ७००मि.मी. व्यासाच्या वाहिनीवर दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच ठिकाणी ही जलवाहिनी फुटल्याने आणखी दोन दिवस या जलकुंभावरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पारडी १ व २ आणि भांडेवाडी भागातील नागरिकांना मागील चार दिवसापासून पाणी न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी झोन कार्यालयाला कुलूप ठोकून फर्निचरची तोडफोड केली होती. गुरुवारी पाणी मिळणार होते. पण जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना आणखी दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
यामुळे पारडी भागातील महाजनपुरा, खाटीकपुरा, मातंगपुरा, डबलेवाडी, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, ठवकरवाडी, अंबेनगर, समतानगर, एकतानगर, दुर्गानगर, सराई मोहल्ला, हनुमान मंदिर, सद्गुरुनगर, विनोबा भावेनगर, कोष्टीपुरा, राणी सती ले-आऊट, जय दुर्गानगर, रामभूमी १, रामभूमी २, सुंदरनगर, शेंडेनगर, दीपनगर, तालपुरा, शारदानगर, भवानी मंदिर, गणेश मंदिर परिसर, राममंदिर परिसर, घटाटेनगर, अशोकनगर, रेणुकानगर, गंगाबाग, नवीननगर, श्यामनगर, आभानगर, भरतवाडा गाव, करारेनगर, पुनापूर गाव, शिवशक्तीनगर, राजनगर, बालाजी किराणा, वैष्णोदेवीनगर, श्रावणनगर, सरजू टाऊन, खांदवानी टाऊन, पवनशक्तीनगर, अंतुजीनगर, तुलसीनगर, अब्बुमियांनगर, महेशनगर, मेहेरनगर, सरोदेनगर, साहिलनगर, आदी भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.