तीन जलकुंभावरून उद्या पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:38+5:302021-03-21T04:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी लकडगंज १ व २ जलकुंभांवर देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी लकडगंज १ व २ जलकुंभांवर देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या सोमवारी २४ तासाचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. यामुळे सोमवारी सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० पर्यंत या जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार नाही. तर आशीनगर झोनमधील नारी जलकुंभ स्वच्छ करणार असल्याने सोमवारी या जलकुंभावरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊनदरम्यान आऊटलेटवर व्हॉल्व्ह बसविणे आंतरजोडणीचे काम केले जाणार आहे.
...
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग : लकडगंज १ : जुनी मंगळवारी, गरोबा मैदान, भुजाडे मोहल्ला, ढिवरपुरा, स्वीपर कॉलनी, माताघरे मोहल्ला, चिंचघरे मोहल्ला, पंडितपुरा, कोष्टीपुरा, चून खाई टेकडा, गांधीलवाडा, गुजरनगर, धावडे मोहल्ला, माटे
चौक, कापसे चौक, जगजीवनरामनगर, हरिहरनगर, बाबुलबन, हिवरी ले-आऊट, हिवरीनगर, भाऊरावनगर, वर्धमाननगर, ईस्ट वर्धमाननगर, कच्ची विसा.
लकडगंज २ : एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, पडोळेनगर, पँथरनगर, ट्रान्सपोर्टनगर, पडोळेनगर स्लम, हिवरी ले-आऊट स्लम, शास्त्रीनगर आणि शास्त्रीनगर स्लम, बजरंगनगर, कुंभारटोली, सतरंजीपुरा, किराडपुरा, मटन मार्केट, मालधक्का, बुद्धपुरा, बैरागीपुरा, रामपेठ, गंगाजमुना, क्वेटा कॉलनी, एव्हीजी कॉलनी, लकडगंज, सतनामीनगर, शाहू मोहल्ला, दानागंज स्वीपर कॉलनी, स्माॅल फॅक्टरी एरिया, भगवतीनगर, जुना बगडगंज, बाबुलबन, हरिहरनगर, दत्तानगर, शिवाजी सोसायटी व ईडब्ल्यूएस कॉलनी.
नारी जलकुंभ : संन्याल नगर, सहयोगनगर, नारी गाव, दीक्षितनगर, गुरु तेज बहादूरनगर, दीपकनगर, मैत्री कॉलनी, कामगारनगर, आवळेनगर, शेंडेनगर, मानवनगर, कपिलनगर, महाराणा प्रतापनगर, चैतन्यनगर, कामठी रोड, नारी रोड, समर्थनगर, बाबा दीपसिंगनगर, मयूरनगर, कडूनगर, नालंदानगर, प्रभात कॉलनी.