नागपूर शहरातील शेकडो वस्त्यांचा २६ जूनला पाणीपुरवठा खंडित
By मंगेश व्यवहारे | Published: June 24, 2024 06:28 PM2024-06-24T18:28:31+5:302024-06-24T18:28:50+5:30
Nagpur News: महावितरणने नवेगाव खैरी येथील ३३ केव्ही महापालिकेच्या एक्सप्रेस फीडरवर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी २६ जूनला वीज बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर पेंच -४ चे ट्रान्सफार्मर बदलण्यातही येणार आहे. याशिवाय अमृत योजनेंतर्गत सुगतनगर येथे जलवाहिनीच्यांच्या इंटरकनेक्शनचे कामही केले जाणार आहे.
- मंगेश व्यवहारे
नागपूर - महावितरणने नवेगाव खैरी येथील ३३ केव्ही महापालिकेच्या एक्सप्रेस फीडरवर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी २६ जूनला वीज बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर पेंच -४ चे ट्रान्सफार्मर बदलण्यातही येणार आहे. याशिवाय अमृत योजनेंतर्गत सुगतनगर येथे जलवाहिनीच्यांच्या इंटरकनेक्शनचे कामही केले जाणार आहे. या कामासाठी पेंच-१, पेंच-२, पेंच-३ आणि पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्राचे पंंपिंग बंद रोहणार आहे. त्यामुळे २६ जून रोजी सायंकाळपासून या चारही पंपिंग स्टेशनहून शहराला पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे ९ झोनमधील शेकडो वस्त्यांना २६ जूनच्या सायंकाळपासून पाणीपुरवठा होणार नाही.
झोन निहाय कमांड एरीयातील वस्त्यांचा समावेश
लक्ष्मीनगर - लक्ष्मीनगर जुने, गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, टाकळीसीम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर नवीन
धरमपेठ - रामनगर, फुटाळा लाइन, सिव्हिल लाइन्स, रायफल लाईन, सेमिनरी हिल्स, दाभा, टेकडी वाडी, सीताबर्डी, धंतोली
हनुमाननगर - चिंचभवन, श्रीनगर, नालंदानगर, ओंकारनगर, जोगीनगर, हुडकेश्वर, नरसाळा
गांधीबाग - सीताबर्डी फोर्ट १, २, किल्ला महाल, गोदरेज आनंदम, मेडिकल फीडर
धंतोली - वंजारीनगर रेशीमबाग, हनुमाननगर
मंगळवारी - गिट्टीखदान, गोरेवाडा, राजनगर, सदर
सतरंजीपुरा - बोरियापुरा, मध्य रेल्वे
नेहरूनगर - सक्करदरा १, २
आशीनगर - नारा, नारी, जरीपटका
पांडे लेआऊट फीडरवर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी शटडाऊन
२६ जून रोजी सकाळी ११ ते २७ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पांडे लेआऊट फीडरच्या देखभाल दुरूस्तीसाठी २४ तासांचे शटडाऊन घेण्यात येणार आहे. यात ७०० एमएम व्यासाचे वॉल्व बदलण्यात येणार आहे. गांधीनगर टी पॉईंटवर हे काम करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, टाकळी सिम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, रामनगर, चिंचभवन या जलकुंभावरून पाणी पुरवठा होणाऱ्या शेकडो वस्त्यांवर होणार आहे. या वस्त्यांमध्ये २६ जूनला सायंकाळी आणि २७ जून ला सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.