नागपूरकरांना उद्या पाणीपुरवठा राहणार बंद; दहा जलकुंभांवरून पाणीपुरवठा होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 03:36 PM2024-12-09T15:36:26+5:302024-12-09T15:38:26+5:30
पेंच-४ एक्स्प्रेस फीडरवर २० तासांचे शटडाऊन : टँकरही राहणार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच-४ एक्स्प्रेस फीडरवर १० डिसेंबरला २० तासांचे शटडाऊन घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील १० जलकुंभांवरून मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही. शटडाऊन १० डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरू होऊन ११ डिसेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे.
शटडाऊन करण्यात आलेल्या कालावधीत ६०० मिलीमीटर व्यासाच्या हुडकेश्वर व नरसाळा टॅपिंगजवळ कंटेनर यार्डमध्ये फ्लो मीटर लावण्यात येईल. यामुळे संबंधित लाइनशी निगडित पाण्याच्या टाक्यांवरून पाणीपुरवठा होणार नाही. सोबतच शटडाऊनच्या कालावधीत टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या जलप्रदाय विभाग आणि पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या भागात होणार नाही पाणीपुरवठा
ओंकारनगर पाण्याची टाकी (सध्याची) : गजानननगर, जयवंतनगर, साईनगर, स्वराजनगर, बिनकर कॉलनी, गुरुदेवनगर, इंद्रप्रस्थ सोसायटी, मानेवाडा जुनी वस्ती, दिवाण लेआऊट, कपिलनगर, वनराईनगर, जबलपूर लेआउट, श्रीहरिनगर १, २, ३, ओंकारनगर, सद्भावनानगर.
ओंकारनगर पाण्याची टाकी (प्रस्तावित) : ग्रीन प्लॅनेट कॉलनी, अंबा शिवशक्तीनगर, मंगलदीपनगर १ व २. गुरुदेवनगर, कल्याणेश्वरनगर, गीतानगर, शाहूनगर, कल्पतरूनगर, चंडिकानगर १ व २, चिंतामणीनगर, डायमंड सोसायटी, विराज सोसायटी, नरहरीनगर, आकाशनगर, अवधूतनगर १ व २, शेषनगर, शेवाळे लेआऊट, अजितनाथ सोसायटी, अलंकारनगर, डोबीनगर, संधेरकर लेआऊट, मुद्रानगर, राधानंदनगर, श्रीकृष्णनगर, आराधनानगर १ व २, अभिजितनगर १ व २, दौलतनगर.
जोगीनगर (अमृत) पाण्याची टाकी) : जोगीनगर, काशीनगर, अभयनगर, महात्मा फुले कॉलनी, वैष्णव सोसायटी, रामटेकेनगर, रहाटेनगर, राजश्रीनगर, जयवंत सोसायटी, रमानगर, ८५ प्लॉट एरिया, रेणुका विहार, धाडीवाल लेआऊट, फुलमती लेआऊट, एकतानगर,
हुडकेश्वर पाण्याची टाकी : अमरनगर, न्यू अमरनगर, गुरुकुंजनगर, महाकालीनगर, सरस्वतीनगर, जानकीनगर, विज्ञाननगर, संजय गांधीनगर, न्यू नेहरूनगर, भोले बाबानगर, संत केसरमाता नगर, संतोषीनगर, विठ्ठलनगर १ व २, कार्पोरेशन कॉलनी, धनगवळीनगर, म्हाळगीनगर (जुने व नवे), महात्मा गांधीनगर, गजानननगर, सूर्योदयनगर, महालक्ष्मीनगर, प्रेरणानगर (जुने व नवे), विनायकनगर, अन्नपूर्णानगर,
नालंदानगर पाण्याची टाकी : चंद्रनगर, भगवाननगर, बँक कॉलनी, बालाजीनगर, उल्हासनगर, नाईकनगर, मित्रनगर, कैलासनगर (जुने व नवे) ज्ञानेश्वरनगर, पार्वतीनगर, जयभीमनगर, बाबुलखेडा, बॅनर्जी लेआऊट, महात्मा फुले कॉलनी.
श्रीनगर पाण्याची टाकी : शिल्पा सोसायटी, नगरविकास सोसायटी, नवनाथ सोसायटी, श्रीनगर, नरेंद्रनगर, भीमनगर, जोगीनगर, युनिक सोसायटी, पार्वतीनगर, जय दुर्गा सोसायटी, अरविंद सोसायटी, उज्ज्वल सोसायटी, सुंदरवन लेआऊट, रानवाडी, बोरकुटे लेआऊट, सुयोगनगर, साकेतनगर, धाडीवाल लेआऊट, हावरापेठ, द्वारकापुरी, रामेश्वरी, मस्के लेआऊट, गुरुदत्ता सोसायटी, चिरंजिवीनगर, पीएमजी लेआऊट, बालपांडे लेआऊट, संताजी सोसायटी, साईकृपा सोसायटी.
सक्करदरा १ व २ पाण्याची टाकी: गवंडीपुरा, सेवादलनगर, राणी भोसलेनगर, गोंडपुरा, दत्तात्रयनगर, सुर्वे लेआऊट, बँक कॉलनी, जवाहरनगर, चक्रधरनगर, इस्ट बालाजीनगर, दुर्गानगर, लाडेकर लेआऊट, श्रीनगर, लवकुशनगर, उदयनगर, अयोध्यानगर, आदिवासी लेआऊट, सच्चिदानंदनगर, जुना सुभेदार लेआऊट.
सक्करदरा ३ : न्यू सुभेदार लेआऊट, गुरुदेवनगर, रुक्मिणीनगर, श्रीरामनगर, संजय गांधीनगर, आशीर्वादनगर, महावितरण कॉलनी, द्वारकानगर, राजीव गांधीनगर, न्यू बिडीपेठ, जुनी बिडीपेठ, इंदिरा गांधीनगर, सरताज कॉलनी, ताज अम्मा कॉलनी, ठाकूर प्लॉट, टीचर्स कॉलनी, यासीन प्लॉट, तौहिदनगर.
हुडकेश्वर व नरसाळा टॅपिंग : चंद्रभागा ईएसआर, संभाजीनगर ईएसआर, भारतमाता ईएसआर, ताजेश्वरनगर ईएसआर.