सोमवारी नागपुरातील 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 12:40 PM2022-03-05T12:40:09+5:302022-03-05T12:46:09+5:30
सोमवारी ७ मार्चला सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. या कालावधीत सीताबर्डी, रामदासपेठ व धंतोली भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या राज भवन जलकुंभ ते सीताबर्डी मुख्य जलवाहिनीवर संविधान चौकालगत फ्लोव मीटर लावण्यात येणार आहे. यासाठी मनपा व ऑरेज सिटी वॉटर ह्यांनी या जलवाहिनीवर सोमवारी ७ मार्चला सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. या कालावधीत सीताबर्डी, रामदासपेठ व धंतोली भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग
राज भवन जलकुंभ ते सीताबर्डी मुख्य जलवाहिनी : वसंतराव नाईक समाजकार्य महाविद्यालय (मॉरिस कॉलेज), झिरो मैल मेट्रो रेल्वे स्टेशन परिसर, टेकडी लीने, सोनी गल्ली, टेम्पल बाजार रोड, आलू गल्ली, कलर लाईन, मयत वली गल्ली , कीर्तन गल्ली, सीताबर्डी मार्केट परिसर, मोदी नंबर १, २, ३, हनुमान गल्ली, सोमवार बाजार रोड, पायदानवाला लीने, गवळीपुरा, हनुमान वाटिका, रात्र निवारा गल्ली, महाजन मार्केट, महाराजबाग रॉड, तेलीपुरा, लता मंगेशकर हॉस्पिटल, पकोडेवाली गल्ली, इलेक्ट्रॉनिक मार्केट, तेलीपुरा, संगम चाळ, कुंभार टोली, नानजीभाई टाऊन, नॉर्मल स्कूल, छोटी धंतोली, रामदासपेठ, यशवंत स्टेडियम, मुंजे चौक परिसर आणि नेताजी मार्केट परिसर