धरमपेठ झोनमधील वस्त्यांचा १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पाणीपुरवठा राहणार बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 05:08 PM2023-11-16T17:08:53+5:302023-11-16T17:09:29+5:30
महापालिका व ओसीडब्ल्यूकडून चार जलकुंभांची स्वच्छता करणार
नागपूर : धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या सेमिनरी हिल्स, युनिव्हर्सिटी कॅम्पस, दाभा व टेकडी वाडी या चार जलकुंभांच्या स्वच्छतेचे काम येत्या १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलकुंभांची स्वच्छता महापालिका व ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येते. या जलकुंभांच्या स्वच्छते दरम्यान जलकुंभांतून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्यांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
सेमिनरी हिल्स जलकुंभाची स्वच्छता १७ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णानगर, धम्मनगर, पंचशीलनगर, आझादनगर, न्यू ताजनगर, आयबीएम रोड, राजीव गांधीनगर, आदिवासी (गोंड) मोहल्ला, मानवतानगर, सुरेंद्रगड, मानवसेवानगर, राजस्थानी मोहल्ला, बजरंग सोसायटी, गजानन सोसायटी, गृहलक्ष्मी समाज, दुहेरी समाज ले-आउट आदी वस्त्यांचा पाणी पुरवठा १७ नोव्हेंबर रोजी बाधित राहणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी युनिव्हर्सिटी कॅम्पस जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार असून, त्या दिवशी जुना फुलताळा, नवीन फुटाळा, हिंदुस्थान कॉलनी, संजयनगर, ट्रस्ट ले-आउट, जयनगर, पांढराबोडी, सुदामानगरी वरचा परिसर, पंकजनगरचा पाणी पुरवठा बाधित राहणार आहे.
- दाभा आणि टेकडी वाडी जलकुंंभाचीही स्वच्छता
दाभा जलकुंभाची स्वच्छता २० नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे दाभा वस्ती, वेलकम सोसायटी, आशादीप सोसायटी, आदिवासी समाज, सरकारी प्रेस सोसायटी, अंबर कॉलनी, संत ताजुद्दीन सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, मेट्रोसिटी सोसायटी, गणेश नगर, शिवहरे ले-आउट, संत जगनाडे सोसायटी, न्यू शांतीनगर, हिल व्ह्यू सोसायटी, ठाकरे ले-आउट, उत्कर्षनगर, एअरफोर्स कॉलनी, आशा बालवाडी, शिव पार्वती मंदिर, गवळीपुरा, खाटीपुरा, वायुसेनानगर आदी वस्त्यांचा पाणी पुरवठा बाधित राहणार आहे. टेकडी वाडी जलकुंभाची स्वच्छता २१ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे टेकडी वाडी झोपडपट्टी ११ गल्ली, वैष्णोमाता नगर, सारीपुत्र नगर, ओमशांती ले-आउट, मंगलमूर्ती ले-आउट, दांडेकर ले-आउट, वैभवनगर, अमिता सोसायटी, जीएनएसएस सोसायटी, साईनगर, डोबीनगर, लोकमान्य सोसायटी, त्रैलोक्य सोसायटी, श्रीपूर्णा सोसायटी ले-आउट आदीचा पाणी पुरवठा बाधित राहणार आहे.