पाच वर्षे होऊनही उभारले नाही जलकुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:12 PM2020-08-18T23:12:29+5:302020-08-18T23:14:14+5:30

पाच वर्षापूर्वी अटल मिशन फॉर रिजुवनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्र्मेशन (अमृत) प्रकल्पाअंतर्गत नागपूरसाठी केंद्र सरकारने २२६ कोटी रुपये मंजूर केले होते. त्याअनुषंगावे शहराच्या आऊटर वस्त्यांमध्ये जलकुंभ बनविण्याची आणि पाईपलाईन टाकण्याचे काम होणे गरजेचे होते. मात्र, ते झालेले नाही.

The water tank has not been built for five years | पाच वर्षे होऊनही उभारले नाही जलकुंभ

पाच वर्षे होऊनही उभारले नाही जलकुंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच वर्षापूर्वी अटल मिशन फॉर रिजुवनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्र्मेशन (अमृत) प्रकल्पाअंतर्गत नागपूरसाठी केंद्र सरकारने २२६ कोटी रुपये मंजूर केले होते. त्याअनुषंगावे शहराच्या आऊटर वस्त्यांमध्ये जलकुंभ बनविण्याची आणि पाईपलाईन टाकण्याचे काम होणे गरजेचे होते. मात्र, ते झालेले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा याच प्रकल्पाची नवी डेडलाईन ऑगस्ट २०२१ करण्याचा प्रस्ताव सादर होत आहे. सोबतच ज्या कंपनीला हे काम दिले आहे, ती कंपनी आता ४३ पैकी केवळ १७ जलकुंभांचेच काम करण्यास तयार आहे. यामुळे, अमृत योजनेचे कार्यान्वयन जसे दिसते तसे राहीलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत अमृत प्रकल्पाअंतर्गत नागपुरात ४३ जलकुंभांचे निर्माण करायचे आहे. २०१६मध्ये नागपूर मनपाला योजनेअंतर्गत काम करण्यास मंजूरी प्राप्त झाली होती. सुरुवातीला या प्रकल्पासाठी २२६ कोटी रुपये निर्धारित होते. नंतर हा निधी वाढविण्यात आला. २८५.६२ कोटी रुपयाच्या या प्रकल्पाचे कार्यान्वयन मे. वॉप्कोस लि.ला देण्याचा निर्णय २० मार्च २०१८ रोजी घेण्यात आला. २९ जून २०१८ रोजी मनपा आयुक्तांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कन्सल्टन्सी चार्ज पाच टक्केवरून तिन टक्केपर्यंत कमी केले. त्याअनुषंगाने प्रकल्पाची संशोधित किंमत २८०.१८ कोटी रुपये झाली. यात प्रकल्पावर २७२.०२ कोटी रुपये आणि तिन टक्के कन्सल्टन्सी चार्ज देण्याचा निर्णय झाला. स्थायी समितीने ९ जुलै २०१८ रोजी या प्रकल्पाला मंजूरी दिली होती.

दहा जलकुंभांचे काम अशक्य
सर्वेक्षणाअंती केवळ १७ स्थळांवरच जलकुंभाच्या कामाकरिता विविध विभांगांकडून एनओसी मिळाल्याचे वॉप्कोस कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संबंधित परिसरातून पाईपलाईन टाकली जाऊ शकते. त्याच अनुषंगाने या १७ जलकुंभांचे काम करण्यास सहमती दर्शवली आहे. ऊर्वरित १६ जलकुंभांचे निर्माण मनपा करणार आहे. इतर १० स्थळांवर जलकुंभांसाठी बऱ्याच अडचणी असल्याने, येथे जलकुंभ बनणे अशक्य आहे.


संशोधित प्रस्ताव
आता प्रकल्पाची संशोधित किंमत २७२.०२ कोटी रुपये करण्यात आली आहे.
नव्या प्रस्तावाअंतर्गत वॉप्कोस कंपनी १७ जलकुंभ आणि संबंधित पाईपलाईनचे काम करेल. संबंधित जलकुंभाकरिता १६५ कोटी रुपये खर्चासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
मनपाकडून १६ जलकुंभांचे निर्माण होईल. यासाठी सुधारित खर्च ६८.८४ कोटी रुपये निर्धारित करण्यात आले आहे.
ऊर्वरित निधी ३८.१८ कोटी रुपये मनपाच्या प्रस्तावित रोहणा प्रकल्पातून कच्चे पाणी घेण्यासाठी खर्च केले जातील.

Web Title: The water tank has not been built for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.