आस पाण्याची, तहान माकडाची
By admin | Published: March 17, 2016 03:24 AM2016-03-17T03:24:50+5:302016-03-17T03:24:50+5:30
उन्हाची काहिली आता वाढायला लागली आहे. तहान लागल्यावर केवळ माणूसच नव्हे तर प्राणीही कासावीस होतातच.
उन्हाची काहिली आता वाढायला लागली आहे. तहान लागल्यावर केवळ माणूसच नव्हे तर प्राणीही कासावीस होतातच. मग सुरु होतो पाण्याचा शोध...माकडांपासून उत्क्रांत होतानाच माणसाची निर्मिती झाली, असे उत्क्रांतीवादाचे शास्त्र सांगते. त्यामुळे माकड हा देखील अनुकरण करणाराच प्राणी. बंद नळ सुरु केला की त्यातून पाणी पडते, हे निरीक्षण या माकडाने केले होते. तहान लागल्यावर या माकडाने आपल्या चिमुकल्यासह प्रयासाने हा नळ सुरु केला आणि तोंड लावून पाणी पिले. त्यानंतर त्याने माणसाप्रमाणेच हा नळ बंद करण्याचाही प्रयत्न केला पण तो बंद करता आला नाही. अखेर तृप्ततेची ढेकर देत माकड पुन्हा झाडावर जाऊन बसले. नागपुरातील तेलंगखेडी येथील हनुमान मंदिरात टिपलेला हा प्रसंग.