नागपुरात टंचाई असताना पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:34 PM2020-05-30T21:34:58+5:302020-05-30T21:36:32+5:30

शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.

Water wasted during scarcity in Nagpur | नागपुरात टंचाई असताना पाण्याची नासाडी

नागपुरात टंचाई असताना पाण्याची नासाडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.
शहराच्या सर्व भागात नळावाटे पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. २४ बाय ७ योजनेअंतर्गत हा पुरवठा होत आहे. मात्र, या योजनेत विषमता दिसून येत आहे. काही ठिकाणी दिवसातून तीन वेळा, तर काही ठिकाणी दररोज तीन तास आणि काही ठिकाणी अर्धा-पाऊण तास, असा पाणीपुरवठा होत आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही अधिक होत आहे. वाठोडा भागात पाणीपुरवठ्याच्या या विषमतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष मिटविण्यासाठी नगरसेवकांकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ज्या टँकर्समधून पाणीपुरवठा केला जातो, त्यातील काही टँकर्स फुटलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून येते. एकीकडे नळाद्वारे पाणीपुरवठ्यात विषमता, दुसरीकडे फुटलेल्या टँकर्समधून होत असलेली पाण्याची नासाडी आणि तरीही पाण्याच्या समस्येपासून होत नसलेली मुक्ती, या संकटात नागरिक सापडले आहेत.

दुरुस्ती करावी अथवा बाद करावे!
गेल्या वर्षी नागपुरात पाण्याच्या टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली होती. ते उदाहरण ताजेच असताना यंदा टँकर मालकांना पाण्याची नासाडी होऊ नये, या अनुषंगाने तंबी देण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. यंदा पाणी मुबलक असले तरी ते टिकवण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र, फुटलेल्या टँकरला परवानगी देऊन नागरी संपत्तीचे नुकसानच शासन-प्रशासनाकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, अशा टँकर्सची दुरुस्ती करणे अथवा ते बाद करणेच उत्तम ठरेल.

Web Title: Water wasted during scarcity in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.