जाता-जाता 'तो' देऊन गेला अवयवरूपी ‘तीर्थ’; तिघांना जीवनदान, तर दोघांना मिळाली दृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 07:16 PM2021-11-18T19:16:16+5:302021-11-18T19:18:12+5:30

ब्रेन डेडच्या रुग्णाने सहा जणांना अवयवदान करून त्यांनी जीवनदान केल्याची घटना नागपुरात घडली.

On the way, he gave the organ-like ‘Tirtha’; Three were given life, while two got sight | जाता-जाता 'तो' देऊन गेला अवयवरूपी ‘तीर्थ’; तिघांना जीवनदान, तर दोघांना मिळाली दृष्टी

जाता-जाता 'तो' देऊन गेला अवयवरूपी ‘तीर्थ’; तिघांना जीवनदान, तर दोघांना मिळाली दृष्टी

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ वर्षीय तीर्थ शहाचे अवयवदान

नागपूर : एकुलता एक मुलगा ‘तीर्थ’ रविवारी बाईकवरून खाली पडला. डोक्याला मुका मार बसला. घारी आल्यावर त्याने उलटी केली. जेवण केले आणि झोपी गेला. सकाळी आजोबा त्याला उठवायला गेल्यावर त्याने कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे तातडीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना ‘ब्रेन डेड’ झाले. त्या दु:खातही त्याच्या आई-वडिलांनी हिंमत दाखवली. अवयवदानाचा निर्णय घेतला... जाता जाता तो पाच रुग्णांना अवयवरूपी ‘तीर्थ’ देऊन गेला...

जगत रेसिडेन्सी, भंडारा रोड येथील रहिवासी तीर्थ शहा त्या अवयवदात्याचे नाव. दोन वर्षांपूर्वीच शहा कुटुंब मुंबई येथून नागपुरात स्थायिक झाले होते. तीर्थना १२ वीची परीक्षा पास केली होती. त्याचे वडील देवांग शहा एका खासगी कंपनीत, तर आई दर्षना शहा यांचे ब्युटीक आहे. घरात आनंदीआनंद असताना ,१४ नोव्हेंबर रोजी तीर्थ बाईकवरून पडला. सायंकाळी घरी आल्यावर त्याने उलटी केली. त्यानंतर जेवण केले आणि झोपी गेला. परंतु सकाळी तो उठलाच नाही.

तातडीने त्याला लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या संगण्यानुसार त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. प्रयत्न सुरू असताना, १७ नोव्हेंबर रोजी ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना दिली. एकुलता एक मुलगा सोडून गेल्याचा जबर धक्का त्या कुटुंबाला बसला. हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. आनंद संचेती आणि निधिष मिश्रा यांनी कुटुंबाचे सांत्वन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. वडील देवांग व आई दर्षना शाह यांनी आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. सजंय कोलते यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोडे यांनी अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण केली. तीर्थ यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड व बुबूळ दान करण्यात आले. यामुळे तिघांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली.

न्यू इरा हॉस्पिटलमधील दोन रुग्णांना जीवनदान

तीर्थ याचे एक मूत्रपिंड न्यू इरा हॉस्पिटमधील ६४ वर्षीय पुरुषाला, तर यकृत ५६ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण डॉॅ. प्रकाश खेतान, डॉ. रवी देशमुख, डॉ. शब्बीर रजा, डॉ. साहिल बंसल व डॉ. स्नेहा खाडे यांनी केले, तर यकृताचे प्रत्यारोपण डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. आनंद संचेती व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेने यांनी यशस्वी केले. दुसरे एक मूत्रपिंड एका खासगी हॉस्पिटलमधील २८ वर्षीय तरुणाला देण्यात आले; तर दोन्ही बुबूळ माधव नेत्रपेढीला दान करण्यात आले.

-हृदय व फुफ्फुस गेले वाया

नागपुरात चार हृदय प्रत्यारोपण केंद्र व एक फुफ्फुस प्रत्यारोपण केंद्र आहे. परंतु या केंद्रात एकाही गरजू रुग्णाची नोंद नाही. यामुळे ‘झेडटीसीसी’ने ‘नॅशनल ऑर्गन ॲण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (नोटो) अंतर्गत हे दोन्ही अवयव बाहेर पाठविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु चेन्नई येथील ५२ वर्षीय पुरुषाला विशेष विमानाचे भाडे परडवणारे नव्हते; तर धुळे येथील ४७ वर्षीय पुरुषाला फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी तयार करण्यात वेळ गेला. यामुळे दोन्ही अवयव वाया गेले. आतापर्यंत नागपुरातून १४ हृदय व ३ फुफ्फुस बाहेर गेले आहेत.

Web Title: On the way, he gave the organ-like ‘Tirtha’; Three were given life, while two got sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.