माेवाड शहराची ‘हाॅटस्पाॅट’कडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:13 AM2021-02-28T04:13:34+5:302021-02-28T04:13:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : दुसऱ्या टप्प्यात माेवाड (ता. नरखेड) शहरात काेराेनाचे २० पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : दुसऱ्या टप्प्यात माेवाड (ता. नरखेड) शहरात काेराेनाचे २० पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहर ‘हाॅटस्पाॅट’कडे वाटचाल करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे काेराेना संक्रमण राेखण्यासाठी स्थानिक नगर परिषद व प्राथमिक आराेग्य केंद्र प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे गरजेचे आहे.
टाळेबंदी उठविल्यानंतर नागरिक राेजगाराला लागले. टाळेबंदीकाळात अनेकांना राेजगार गमवावे लागले. शेतकऱ्यांसह कामगारही आर्थिक संकटात सापडले. मध्यंतरी, काेराेनाच्या चाचण्यांचे प्रमाणही कमी करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या मनातील काेराेनाची भीती कमी व्हायला सुरुवात झाली. त्यातच लग्नसमारंभ व इतर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यात सहभागी हाेणाऱ्या बहुतांश नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्याकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यातच, दुसऱ्या टप्प्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येताच खळबळ उडाली.
जिल्ह्यात काेराेना रुग्ण वाढत असतानाच माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रातही चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. आठवडाभरात (शुक्रवार, दि. २६ पर्यंत) माेवाड शहरातील ५९० नागरिकांची, तर महिनाभरात १,९०० नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली. यात शुक्रवारपर्यंत १४ काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, शनिवारी (दि. २७) त्यात सहा रुग्णांची भर पडल्याने ही रुग्णसंख्सा २० वर पाेहाेचली आहे. या सर्व रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
दुसरीकडे, पहिल्या टाळेबंदीकाळात राेजगार गेल्याने प्रचंड हाल झाले. व्यवसाय ठप्प झाल्याने उत्पन्नही घटले. त्यामुळे अगोदर बचत करून ठेवलेला पैसाही या काळात खर्च झाला. खाेलीचा किराया देणे व नगरपालिकेचा कर भरणे कठीण झाले असून, माेठ्या मुश्किलीने घरखर्च भागत असल्याची प्रतिक्रिया माेवाड येथील व्यावसायिक लखन बाेरकर यांनी व्यक्त केली. दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू केल्यास पूर्वीपेक्षाही अधिक हाल हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...
दुकानदारांच्या टेस्टला सुरुवात
शासनाच्या निर्देशानुसान माेवाड शहरातील दुकानदार, व्यापारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी व कामगारांच्या काेराेना टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवार (दि. २६) पर्यंत ७९ व्यापारी व दुकानदारांची काेराेना चाचणी करण्यात आली हाेती. शहरातील काही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण शहरात खुलेआम फिरत आहेत. त्यांच्यावर कुणाचाही प्रतिबंध नाही. शिवाय, पालिका प्रशासनाने शहरात काेणत्याही उपाययाेजना प्रभावीपणे राबवायला सुरुवात केली नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणाकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.