वेकोलिने रोखला महाजेनकोचा कोळसा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:05 PM2020-07-06T23:05:06+5:302020-07-06T23:07:07+5:30
कोविड-१९ आणि वीज बिलाबाबत लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा सामना करीत असताना राज्यावरील विजेचे संकट थोडक्यात टळले. वीज उत्पादन कंपनी महाजेनकोने बिल अदा न केल्यामुळे वेकोलिने कोळसा पुरवठा रोखला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ आणि वीज बिलाबाबत लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा सामना करीत असताना राज्यावरील विजेचे संकट थोडक्यात टळले. वीज उत्पादन कंपनी महाजेनकोने बिल अदा न केल्यामुळे वेकोलिने कोळसा पुरवठा रोखला. त्यामुळे खळबळ उडाली. महाजेनकोने सोमवारी ४५० कोटी भरल्यानंतर वेकोलिने कोळशाचे रॅक रवाना केले. कोळसा पुरवठा बंद करण्यात आला असता तर राज्यात विजेचे संकट निर्माण झाले असते.
वेकोलिने दिलेल्या माहितीनुसार, कामगारांच्या संपामुळे दोन दिवस पुरवठा बंद होता. संपानंतर कंपनीने पैसे न दिल्यामुळे महाजेनकोचा पुरवठा रोखण्यात आला. वेकोलि ९ रॅक कोळसा लोड करते. यापैकी महाजेनकोचे ७ रॅक असतात. हा पुरवठा वेकोलिने एक दिवसासाठी रोखला. सोमवारी महाजेनकोकडून ४५० कोटी रुपये जमा केल्यानंतर पुरवठा पूर्ववत करण्यात आला.