वेकोलि आता रेती पुरवठाही करणार : मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:10 PM2019-05-27T23:10:23+5:302019-05-27T23:11:01+5:30

वेस्टर्न कोल फील्डस्कडे खाणींमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाणीमधील ही रेती शासकीय संस्थांना वेकोलि देण्यास तयार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय संस्थांशी वेकोलिने सामंजस्य करार करून रेती पुरवठा करावा व उर्वरित रेती खासगीरीत्या विक्री करावी, अशा सूचना वेकोलि प्रशासनाला दिल्या. महानिर्मितीनेही रेतीबाबत वेकोलिशी सामंजस्य करार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

WCL will now also provide sand : large scale sand available | वेकोलि आता रेती पुरवठाही करणार : मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध

वेकोलि आता रेती पुरवठाही करणार : मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय संस्थांशी पुरवठ्याचे सामंजस्य करार करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेस्टर्न कोल फील्डस्कडे खाणींमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाणीमधील ही रेती शासकीय संस्थांना वेकोलि देण्यास तयार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय संस्थांशी वेकोलिने सामंजस्य करार करून रेती पुरवठा करावा व उर्वरित रेती खासगीरीत्या विक्री करावी, अशा सूचना वेकोलि प्रशासनाला दिल्या. महानिर्मितीनेही रेतीबाबत वेकोलिशी सामंजस्य करार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
वेकोलिमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी हे निर्देश दिले. यावेळी वेकोलिचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्रा, खनिज महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष जयस्वाल उपस्थित होते. एकीकडे रेतीची टंचाई असताना वेकोलिकडे मात्र मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागालाही वेकोलिशी रेतीबाबत करार करण्याचे निर्देश दिले. वेस्टर्न कोल फील्डच्या भानेगाव, गोंडेगाव या खाणींमध्ये रेती उपलब्ध आहे. मॉईल या शासकीय संस्थेचा ५० हजार घनमीटरसाठ़ी सामंजस्य करार झाला आहे. कामठी नगर परिषदेशीही १५ हजार घनमीटरचा करार झाला आहे. महानिर्मितीशी २० हजार घनमीटर, व्हीआयडीसी ३८ हजार घनमीटर, म्हाडा ५६ हजार घनमीटर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याशी सामंजस्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. खासगी व्यक्तींना ७९७.६ रुपये घनमीटर दरात रेती उपलब्ध होऊ शकते. वेकोलिकडे असलेल्या प्रचंड रेतीच्या साठ्यामुळे बांधकामाचे दरही कमी होऊ शकतात व रेतीटंचाई दूर होऊ शकते.

Web Title: WCL will now also provide sand : large scale sand available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.