आम्ही भटके विमुक्त जमातीचे, कुणी मतदान मागायला येऊ नका

By निशांत वानखेडे | Published: October 23, 2024 05:42 PM2024-10-23T17:42:50+5:302024-10-23T17:44:44+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : जमातीच्या वस्तीवर लागले बॅनर; साधे जातीचे प्रमाणपत्र नसल्याने असंताेष

We are a nomadic tribe, don't come to ask for vote | आम्ही भटके विमुक्त जमातीचे, कुणी मतदान मागायला येऊ नका

We are a nomadic tribe, don't come to ask for vote

नागपूर : भटक्या विमुक्त जमातीच्या वस्तीमध्ये सध्या झळकत असलेल्या बॅनरने या समाजाची खदखद दिसून येत आहे. साधे जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, मग याेजनांचा लाभ मिळणे तर शेकडाे मैल दूर आहे, अशी भावना मांडत आमच्या वस्तीत कुठल्याही राजकीय पक्षाने मतदान मागायला येऊ नये, अशी खदखद वस्तीच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विदर्भातील भटक्या विमुक्त जमातीच्या अशा अनेक वस्त्यांमध्ये असे बॅनर लावण्यात आल्याची माहिती आहे. साहेब आम्ही भारतीय आहोत आणि भटक्या विमुक्त जमाती मध्ये येतो. या जमातीकडे कोणतीही जमीन नाही, त्यामुळे महसूल पुरावा कोठून आनणार? आजाेबा, पणजोबा, वडील यांनी कधी शिक्षण घेतले नाही, मग त्यांच्या जातीची नोंद कोठून आणावी, अशी उद्विग्नता या वस्त्यांमधील नागरिकांनी व्यक्त केली. आता मुलं मोठी झाली, शिकायला लागली, त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, आम्हला घरकुल मिळावे, यासाठी सर्वत्र जातीचे प्रमाणपत्र मागितले जातात. यासाठी अनेकदा जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार, नगरसेवक, समाजकल्याण अधिकारी यांचे उंबरठे चालून चप्पल झिजले आहेत, तरी प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे आमची जात कोणती ते तरी ठरवून दया आणि त्याचे प्रमाणपत्र दया, अशी आर्त मागणी सर्व भटके विमुक्त जमातीच्या लाेकांनी केली आहे.

आता निवडणुकीचा वेळ आल्याने सर्व पक्षाचे उमीदवार घेऊन वस्तीत येणार. मात्र आयुष्याचे साधे प्रश्न सुटत नसतील तर या लाेकशाहीचा लाभ काय? आमची जात वैध नाही, तर मग आमचे मतदान कसे वैध, असा उद्विग्न सवाल हे नागरिक करीत आहेत. त्यामुळे काेणत्याच पक्षाच्या उमेदवारांनी मतदान मागायला आमच्या वस्तीत येऊ नये आणि आपला फुकट वेळ गमावू नये असे फलक सर्वत्र विदर्भात वस्तीवर लावल्याचे दिसत आहे.

Web Title: We are a nomadic tribe, don't come to ask for vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.