आम्ही सारी माणसे, माणुसकी हाच आमचा धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:00+5:302021-04-26T04:07:00+5:30

नागपूर : कधी पाहिली व अनुभवली नसेल अशा स्थितीचा सामना सध्या मानवी समाज करीत आहे. काेराेना विषाणूचा जगाला विळखा ...

We are all human beings, humanity is our religion | आम्ही सारी माणसे, माणुसकी हाच आमचा धर्म

आम्ही सारी माणसे, माणुसकी हाच आमचा धर्म

googlenewsNext

नागपूर : कधी पाहिली व अनुभवली नसेल अशा स्थितीचा सामना सध्या मानवी समाज करीत आहे. काेराेना विषाणूचा जगाला विळखा पडला आहे आणि भारतात ही स्थिती अधिकच वाईट हाेत चालली आहे. मानवी प्रजातीच्या अस्तित्वाचेच माेठे संकट या विषाणूने निर्माण केले आहे. काेणत्याही संकटाच्या काळात आपसातील हेवेदावे विसरून एकमेकांच्या मदतीला धावण्याची आपली संस्कृती आहे. मात्र, हा संसर्गजन्य विषाणू एकापासून दुसऱ्याला संकटात टाकणारा असल्याने मदतीला धावण्यावरही मर्यादा आल्या आहेत. मात्र, काही जण या संकटाच्या काळातही अनेकांच्या मदतीला धावून जात आहेत. ही संवेदनशील माणसे माणुसकीची जाेपासना करीत संकटात असलेल्या माणसांसाठी राबत आहेत.

राज खंडारे, रक्तदान व गरीब रुग्णांची मदत

राज खंडारे हा तिशीतला तरुण अशा संकटाच्या काळात काेराेनाव्यतिरिक्त इतर रुग्णांच्या मदतीचा सेतु बांधत आहे. सेवा फाऊंडेशनशी जुळलेला हा तरुण मेयाे, मेडिकल यांसारख्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी उपचार साहित्यापासून ते ॲम्ब्युलन्स सेवेपर्यंतची मदत करीत आहेत. दरम्यान, राजने ग्रुपच्या माध्यमातून रक्तदानाचा सेतु तयार केला आहे. त्यांनी ३५०० च्या वर नियमित रक्तदात्यांची फाैज तयार केली आहे. नियमित कॅम्प घेण्यासह गरज असेल तेव्हा टीमचे सदस्य रक्तदानासाठी तयार असतात. त्यांच्यामुळे कॅन्सरशी लढा देणारे रुग्ण, गराेदर महिला व इतर गरजू रुग्णांना तातडीची मदत हाेत आहे.

- काेट :

आम्ही हे सर्व शासकीय रुग्णालयात उपचारास येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी करीत आहाेत. दरमहा ३० ते ४० रुग्णांना उपचाराची मदत करण्यासह गरजेच्या वेळी रक्तदानासाठी सदस्य तयार असतात. या काळात १००० च्या जवळपास रक्तबॅग पुरविल्या आहेत. गरीब, बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना धावपळ करावी लागू नये, हीच इच्छा आहे.

- राज खंडारे

पुरुषाेत्तम भाेसले, रुग्णांच्या नातलगांना जेवण, नाष्टा, पाणीपुरवठा

सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा पुरुषाेत्तम भाेसले यांनी घेतला आहे. ते या फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आहेत. तसे मेयाे, मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांसाठी गेल्या दाेन वर्षांपासून फाऊंडेशनचे व्हाॅलेंटियर सकाळ-सायंकाळ जेवणाचा पुरवठा करीत आहेत. जेवण देण्याचा उपक्रम तर नियमित सुरू आहे, मात्र काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून त्यांनी सेवेचा विस्तार केला. आपल्या प्रियजनांसाठी मेयाे आणि मेडिकलबाहेर दिवस-रात्र वाट पाहणाऱ्या नातेवाइकांना पाणी आणि नाष्टा पाेहचविण्यास भाेसले यांच्या मार्गदर्शनानुसार सहकारी झटत आहेत.

- काेट : काळ खराच अतिशय कठीण आहे. रुग्णालयाच्या बाहेरही खितपत असलेल्या नातेवाइकांचे चित्र विदारक आहे. हे चित्र पाहताना स्वस्थ बसता येत नाही. त्या माणसांना आमच्याकडून जी मदत करता येईल, ती करण्याचा छाेटासा प्रयत्न आम्ही करताे आहाेत. : पुरुषाेत्तम भाेसले

Web Title: We are all human beings, humanity is our religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.