‘आम्ही कटिबध्द’ मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात जागर
By गणेश हुड | Published: May 24, 2023 06:36 PM2023-05-24T18:36:48+5:302023-05-24T18:37:18+5:30
Nagpur News स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत २८ मे हा दिवस जागतीक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ‘आम्ही कटिबध्द’ ही संकल्पना घेऊन जिल्हयात २२ ते २८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर सुरू आहे.
गणेश हूड
नागपूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत २८ मे हा दिवस जागतीक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ‘आम्ही कटिबध्द’ ही संकल्पना घेऊन जिल्हयात २२ ते २८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर सुरू आहे. या सप्ताहात मासिक पाळीतील गैसमजांबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे.
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत महिला, मुली, किशोर वयीन मुली यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी या सप्ताह कालावधीत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, आरोग्य् विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, तसेच उमेद मधील महिला बचत गटांच्या सहकार्याने गट विकास अधिकारी यांनी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
गाव पातळीवर, तालुकास्तरावर आशा, अंगणवाडी सेविका, महिला शिक्षीका, बचत गटांच्या महिला, डॉक्टर्स यांच्या सहकार्याने किशोर वयींन मुलींचे चर्चासत्र, त्यांचे प्रशिक्षण ,प्रात्याक्षिके, प्रसार माध्यमात लेखन करणे, निबंध स्पर्धा घेणे, पत्र लेखन करणे तसेच समाज माध्मांचा वापर करुन महिला, मुली यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लोकशिक्षणातून स्वच्छतेचे महत्व पटवून द्या-शर्मा
मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी व स्वच्छतेविषयी ग्रामिण भागात महिलांमध्ये गैरसमज आहेत. मासिक पाळी दरम्यान किशोरवयीन मुली व महिलांमध्ये स्वच्छता व आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेवून लोकशिक्षणातून वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.