आम्ही माणसे आहाेत व माणुसकी हाच धर्म आहे......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:09+5:302021-04-26T04:07:09+5:30

पर्यावरण कार्यकर्ता म्हणून कार्य करणारा कुणाल आता काेराेना रुग्णांच्या मदतीसाठी काम करताेय. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड शाेधण्यापसून ऑक्सिजन ...

We are human beings and humanity is the only religion ... | आम्ही माणसे आहाेत व माणुसकी हाच धर्म आहे......

आम्ही माणसे आहाेत व माणुसकी हाच धर्म आहे......

Next

पर्यावरण कार्यकर्ता म्हणून कार्य करणारा कुणाल आता काेराेना रुग्णांच्या मदतीसाठी काम करताेय. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड शाेधण्यापसून ऑक्सिजन व औषधांसाठीही संघर्ष करावा लागताे आहे. या परिस्थितीमुळे रुग्ण व आप्तजन घाबरलेले व भांबावले आहेत. अशा गरजूंना मार्गदर्शनाचा प्रयत्न कुणाल व त्यांची टीम साेशल मीडियावरील ‘दि स्ट्रेन्थ ऑफ युनिटी फाऊंडेशन’ या ग्रुपच्या माध्यमातून करीत आहे. शहरात रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, ऑक्सिजन पुरविण्याबाबत माहिती, औषधांचा पुरवठा आणि गरज पडल्यास घरपाेच वैद्यकीय मदत पाेहचवून देण्याचे काम ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे.

- काेट : आजच्या परिस्थितीत संसर्ग झालेल्या रुग्णाचे नातेवाईक भांबवलेल्या मन:स्थितीत असतात. त्यातही पेशंट गंभीर असेल तर परिस्थिती बिकट हाेऊन जाते. अशांना याेग्य मदत मिळावी आणि त्यांची भीती दूर व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. ७-८ प्रकारची मदत या माध्यमातून करीत आहाेत.

- कुणाल माैर्य

शुभम दामले, रक्तदानाचा वसा

शुभम व त्याच्या मित्रांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. काेराेनाच्या काळात रक्तदानाची शिबिरे जवळजवळ नगण्य झाली आहेत. त्यामुळे रुग्णालयात काेराेना व्यतिरिक्त इतर गरजू रुग्णांना रक्तटंचाईचा सामना करावा लागताे आहे. अशावेळी शुभम व त्याच्या मित्रांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. या दुसऱ्या लाटेच्या काळात तीनदा रक्तदानाचा कॅम्प घेऊन मेडीकल रुग्णालयाला २५० च्या जवळपास बॅग पुरविल्या आहेत. यासाठी मेडिकल प्रशासनानेही त्यांना आवाहन केले हाेते. शिवाय गरज पडल्यास त्यांच्या टीमचे सदस्य रक्तदानासाठी तयार असतात.

काेट : या संकटाच्या काळात कुठल्या छाेट्याशा गाेष्टीसाठी मदत करण्याची संधी आम्हाला मिळत आहे, त्याचे माेठे समाधान वाटते.

- शुभम दामले

Web Title: We are human beings and humanity is the only religion ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.