दसऱ्याच्या पहाटे आकाशात ‘धुमकेतू’ची दिवाळी; रमन विज्ञान केंद्रात विशेष व्यवस्था

By निशांत वानखेडे | Published: October 1, 2024 06:58 PM2024-10-01T18:58:42+5:302024-10-01T18:59:09+5:30

‘त्सुचिन्शन ऍटलास' जाईल पृथ्वीच्या जवळून : पूर्वेकडे उघड्या डाेळ्यानी हाेईल दर्शन

We can see 'Dhumketu' in the sky on the occasion of Dussehra; Special arrangement at Raman Science Centre | दसऱ्याच्या पहाटे आकाशात ‘धुमकेतू’ची दिवाळी; रमन विज्ञान केंद्रात विशेष व्यवस्था

We can see 'Dhumketu' in the sky on the occasion of Dussehra; Special arrangement at Raman Science Centre

नागपूर : हजाराे-लाखाे धुमकेतू आपल्या अंतराळात फिरत असतात, पण त्यातील काही हानीकारक ठरणाऱ्या माेजक्याच धुमकेतूचे दर्शन घडू शकते. असाच एक धुमकेतू सूर्याभाेवजी भ्रमंती करताना पृथ्वीजवळून जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी पहाटे पूर्वेकडच्या आकाशात ‘त्सुचिन्शन अॅटलस’ नामक या धुमकेतूचे उघड्या डाेळ्यांनी दर्शन घडू शकेल.

रमन विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी सांगितले, काही धुमकेतू सूर्याभाेवती वेगाने भ्रमंती करतात व ५० वर्षातून एकदा त्यांचे दर्शन घडते. मात्र काहींचे वेळापत्रक नसते व त्यांना एक भ्रमंती पूर्ण करायला २०० हून अधिक वर्षाचा कालावधी लागताे. ‘त्सुचिन्शन अॅटलस’ या धुमकेतूचा कार्यकाळ ८०,००० वर्षाचा असल्याचे बाेलले जात आहे. सध्या हा धुमकेतू सूर्याच्या जवळ असल्याने त्यांचे स्पष्ट दर्शन हाेत नाही. लवकरच ऑक्टाेबरमध्ये ताे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधून जाईल व नंतर दृष्टीआड होईल. ऑक्टोबरमध्ये त्याला पाहण्याची संधी आहे. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ राहणार आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी पूर्वेकडे त्याचे दर्शन घडेल, अशी माहिती वाघ यांनी दिली.

चीनमधील पर्पल माउंटेन वेधशाळेने ९ जानेवारी २०२३ राेजी हा धुमकेतू शाेधला हाेता. त्यानंतर २२ फेब्रुवारी राेजी अॅटलस रोबोटिक दुर्बिणीच्या मदतीने त्याची पुन्हा नाेंद करण्यात आली. त्यामुळे या धुमकेतूला ‘त्सुचिन्शन अॅटलस’ असे नाव देण्यात आले आहे. धुमकेतू हे वायू व बर्फाळ पिंड असतात, जे सूर्याभाेवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतात.

रमन विज्ञान केंद्रात विशेष व्यवस्था
सध्या आकाशात शनि आणि शुक्र ग्रहांचे दर्शन हाेत आहे. हे दाेन्ही ग्रह पाहण्यासाठी रमन विज्ञान केंद्र व तारामंडळातर्फे ऑक्टाेबरच्या दुसऱ्या आठवड्यात विशेष व्यवस्था केली जाणार आहे. यासाेबतच ‘त्सुचिन्शन अॅटलस’ हा धुमकेतू पाहण्यासाठीही केंद्रातर्फे व्यवस्था करण्यात येईल.

Web Title: We can see 'Dhumketu' in the sky on the occasion of Dussehra; Special arrangement at Raman Science Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर