सारी दुनियाका बोझ हम उठाते है ; एक रुपयाही न घेता चढविले प्रवाशांचे सामान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:33 AM2018-06-08T00:33:23+5:302018-06-08T00:37:26+5:30
आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए १ कोचच्या एसीत बिघाड झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर या गाडीला दुसरा कोच जोडण्यात आला. कोच जोडल्यानंतर गाडीला विलंब होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी एक रुपयाही प्रवाशांकडून न आकारता विनाशुल्क त्यांचे सामान नव्या कोचमध्ये ठेवून माणुसकीचा परिचय दिला. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीही यशवंतपूर-गोरखपूर गाडीचे चाकतुटल्यानंतरही कुलींनी प्रवाशांचे सामान विनाशुल्क चढविण्यात मदत केली होती, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए १ कोचच्या एसीत बिघाड झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर या गाडीला दुसरा कोच जोडण्यात आला. कोच जोडल्यानंतर गाडीला विलंब होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी एक रुपयाही प्रवाशांकडून न आकारता विनाशुल्क त्यांचे सामान नव्या कोचमध्ये ठेवून माणुसकीचा परिचय दिला. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीही यशवंतपूर-गोरखपूर गाडीचे चाकतुटल्यानंतरही कुलींनी प्रवाशांचे सामान विनाशुल्क चढविण्यात मदत केली होती, हे विशेष.
रेल्वेगाडी क्रमांक १२१२९ पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या एसीमध्ये मार्गात बिघाड झाला. एसी दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी या कोचमधील प्रवाशांनी बडनेरा, वर्धा स्थानकावर गोंधळ घातला. परंतु एसीची दुरुस्ती करण्यात आली नाही. या गाडीतील प्रवासी गोंधळ घालत असल्याची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला समजताच येथील अधिकाऱ्यांनी ए-१ कोच तयार ठेवला. ही गाडी सकाळी १०.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. गाडी येताच रेल्वे प्रशासनाच्यावतीने एसी नादुरुस्त झालेला ए-१ कोच तातडीने बदलून नवा कोच गाडीला जोडला. तर गाडीला विलंब होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी केलेल्या
आवाहनानुसार रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजीद यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रवाशांचे सामान नव्या कोचमध्ये विनाशुल्क हलविले. कुलींनी दिलेल्या सेवेबद्दल या गाडीतील प्रवाशांनीही कुलींचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.