प्राप्तीसाठी त्याग करावा लागतो
By admin | Published: August 4, 2014 12:51 AM2014-08-04T00:51:13+5:302014-08-04T00:51:13+5:30
ज्याला काही प्राप्त करून घ्यायचे आहे, त्याला काही सोडावे लागेल, असे उद्गार आचार्यश्री सन्मतिसागरजी महाराज यांचे शिष्य युवा जैन संत सुवीरसागरजी महाराज यांनी येथे काढले.
जैन मुनि सुवीरसागरजी यांचे प्रवचन
नागपूर : ज्याला काही प्राप्त करून घ्यायचे आहे, त्याला काही सोडावे लागेल, असे उद्गार आचार्यश्री सन्मतिसागरजी महाराज यांचे शिष्य युवा जैन संत सुवीरसागरजी महाराज यांनी येथे काढले. चातुर्मासानिमीत्त श्री सैतवाल जैन संघटनेच्यावतीने महावीर नगर येथील जैन मंदिरात त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी भक्तांना संबोधित करताना मुनिश्री म्हणाले, जी व्यक्ती प्राप्त करू ईच्छिते ती काहीच सोडायला तयार नसते. त्या व्यक्तीला जीवनात सर्वकाही कधीही प्राप्त होत नाही. तिचे जीवन सदा अपूर्ण राहते. या जीवनात प्रत्येकाला कुणाची ना कुणाची आवश्यकता असते.
वृद्धत्व आल्यानंतर मुलामुलींचा आधार पाहिजे असतो. त्याच प्रमाणे संतांनाही श्रोत्यांचा आणि श्रोत्यांना संतांचा आधार पाहिजे. परंतु कुणी या संसारात मोफत आधार देत नाही. त्यात काहीना काही स्वार्थ दडलेला असतो. केवळ परमात्म्याचा एकमात्र सत्य आधार आहे, असेही ते म्हणाले. दीपप्रज्वलन मोदी कुटुंब, सतीश पेंढारी, सुुभाष मचाले, प्रवीण भिलांडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येत श्रोते उपस्थित होते. (प्रतिनिधी)