अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:39 AM2020-05-05T00:39:18+5:302020-05-05T00:42:40+5:30

‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

We need to increase domestic production to strengthen economy: Nitin Gadkari | अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देपरकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपुरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी गडकरी यांनी आॅनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश ढवळून निघत असताना कोरोनापासून आपला बचाव करणे व अर्थव्यवस्था मजबूत करणे ही दोन्ही कामे एकत्रितपणे करण्यास प्राधान्य असले पाहिजे. सद्यस्थितीत देशात तीन वर्षे पुरतील एवढे गहू,तांदूळ आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा मौलिक वाटा असतो. त्यांनी पीक पद्धती बदलली पाहिजे. सोबतच औद्योगिक पातळीवर चीनमधून बाहेर पडणाºया कंपन्यांना आपण आकर्षित केले पाहिजे. त्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. महामार्ग वाहतूक आता सुरू झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा सुरू होणार आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाशी लढा देत असताना लोकांमधील नैराश्य जाऊन आत्मविश्वास कायम राहावा यासाठी वृत्तपत्रांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले.

नागपुरात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू होऊ शकतात
नागपूर जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये सुधारणा करता येतील. संपूर्ण शहर बंद असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कोरोनाचा प्रभाव शहरातील ज्या भागात अधिक आहे, तो भाग वगळता शहराच्या उर्वरित भागातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करता येऊ शकतात. असे करत असताना सुरक्षा व नियमांचे पालन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. लवकरच पूर्ण स्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Web Title: We need to increase domestic production to strengthen economy: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.