वाहतूक नियम आम्ही मोडणार; दंडही भरण्याची आम्हाला नाही चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:45+5:302021-07-08T04:07:45+5:30

नागपूरकरांवर सहा महिन्यात १५ कोटीचा दंड : दीड लाखावर वाहनचालकांनी थकविला दंड नागपूर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यापर्यंत ठीक ...

We will break traffic rules; We don't have to worry about paying fines | वाहतूक नियम आम्ही मोडणार; दंडही भरण्याची आम्हाला नाही चिंता

वाहतूक नियम आम्ही मोडणार; दंडही भरण्याची आम्हाला नाही चिंता

Next

नागपूरकरांवर सहा महिन्यात १५ कोटीचा दंड : दीड लाखावर वाहनचालकांनी थकविला दंड

नागपूर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यापर्यंत ठीक आहे. पण कारवाई केल्यांनतर दंडही न भरणाऱ्यांची शहरात कमी नाही. गेल्या सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी ३ लाख ७९ हजार ५ लोकांवर वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे १५ कोटी ४२ लाख ९२ हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यातील १ लाख ५३ हजार ३५४ वाहनधारकांनी अजूनही दंड थकविला आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईत शिथिलता आणली होती. तरीही रेकॉर्डब्रेक नागपूरकरांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले. वाहनचालकांना शिस्त लागावी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक शाखा नियम मोडणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करते. त्यामागे उद्देश असतो की पुन्हा चालकांनी वाहतुकीचे नियम मोडू नये. पण आम्ही नागपूरकर दंड भरू अथवा ना भरू मात्र वाहतुकीचे नियम मात्र तोडूच. अशीच कृती वाहतूक विभागातून दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात ओव्हरस्पीड, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, विरुद्ध मार्गाने वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट, हेल्मेट न घालणे, ट्रीपल सीट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर अशा कारवाया केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळातही एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवायांमुळे हे आकडे थक्क करणारे आहेत.

- कारवाईचे आकडे (१ जानेवारी ते ३० जून २०२१)

वेगाने वाहन चालविणे - ८,७७८

सिग्नल तोडणे - २०,४३८

नो-पार्किंग - २७,२२३

विरुद्ध मार्गाने वाहन चालविणे - २,२०४

बेधुंदपणे वाहन चालविणे - ९,१८२

फॅन्सी नंबरप्लेट - ३१,०१८

विदाऊट हेल्मेट - ७९,९४४

ब्लॅक फिल्म - १३,३३८

वाहन चालविताना मोबाईलचा वापर - ३५,१७३

जड वाहनांची नो एन्ट्रीमध्ये वाहतूक - १३,६११

ट्रीपल सीट - ८,००९

- दृष्टिक्षेपात

एकूण दंडाची रक्कम - १५,४२,९२, ४०० रुपये.

किती जणांनी मोडला नियम - ३,७९,००५

किती जणांनी भरला दंड - २,२५,६५१

थकबाकी दंडाची रक्कम - ८,७७,०५,४०० रुपये.

दंड न भरलेले वाहनचालक - १,५३,३५४

- हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई

नागपूरकरांनी हेल्मेटच्या सक्तीला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला होता. परंतु पोलिसांनी कारवाईचा बडगा सुरूच ठेवला. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हेल्मेटचा वापर वाहनचालक आता करू लागले आहेत. पण काही महाभाग अजूनही हेल्मेटला नकारच देत आहेत. गेल्या सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी अशा ७९,९४४ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर ३५,१७३ वाहनचालकांवर वाहन चालविताना मोबाईलचा वापर करीत असल्यामुळे कारवाई केली आहे.

- सहा महिन्याच्या कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्बंध घातले होते. त्यानंतरही ३ लाख ७९ हजार केसेस समोर आल्या आहेत. सुरक्षेचे नियम हे वाहन चालकांचा जीव वाचविण्यासाठी राहतात. या नियमांची अंमलबजावणी करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ज्यांनी नियम मोडले आणि दंडही न भरले त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

- सारंग आवाढ, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा)

Web Title: We will break traffic rules; We don't have to worry about paying fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.