हाफिजच्या बोलण्याने आम्ही विचलित होणार नाही- हंसराज अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:21 PM2017-11-24T14:21:09+5:302017-11-24T14:24:40+5:30
हाफिज सईदने काश्मीरसोबतची लढाई अधिक तीव्र करण्याची गोष्ट प्रथमच केलेली नाही. ती त्याची भारताबाबतची नेहमीचीच भाषा आहे. मात्र अशा बोलण्याने आम्ही विचलित होत नाही असे उद्गगार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर: हाफिज सईदने काश्मीरसोबतची लढाई अधिक तीव्र करण्याची गोष्ट प्रथमच केलेली नाही. ती त्याची भारताबाबतची नेहमीचीच भाषा आहे. मात्र अशा बोलण्याने आम्ही विचलित होत नाही असे उद्गगार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.
हाफिज सईदने जेव्हा जेव्हा काही उद्गगार काढले ते देशाच्या विरोधातच काढले आहेत. त्याचे आता आश्चर्य वाटत नाही. भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काश्मिरातील लढाई अधिक तीव्र करण्याचा त्याचा जर विचार असेल तर तेथील नागरिक आता हाती दगड घेऊ इच्छित नाही. त्यांना रोजगार हवा आहे. ते देशाच्या मुख्य प्रवाहात राहू इच्छितात.
भारताने हाफिजला अटक करण्याबाबत अमेरिकेवर कुठलाच दबाव आणलेला नाही. उलट त्याच्या दहशती कारवायांमुळेच त्याला पाकीस्तानात ताब्यात घेतले गेले होते.
अलकायद्याद्वारे मुसलमानांना जिहादचे आव्हान देण्याबाबत बोलताना अहीर पुढे म्हणाले, भारतातील मुसलमान नागरिक दुसऱ्या देशासाठी काम करू इच्छित नाही. तो रोहिंग्यांसाठी बंड पुकारणार नाही. भारतीय मुस्लीम युवकांना रोजगार हवा आहे, त्यांना देशासाठी काही करायचे आहे. त्यामुळे अल कायदाच्या भुलाव्यात भारतीय मुस्लीम समाज अजिबात येणार नाही असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.