शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने राज्यकारभार चालवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 04:27 PM2019-09-11T16:27:13+5:302019-09-11T16:28:36+5:30

शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर राज्याचा कारभार करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील बुधवारी येथे दिले.

We work on the path of Shahu, Phule, Ambedkar, Chhatrapati Shivaji Maharaj | शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने राज्यकारभार चालवू

शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने राज्यकारभार चालवू

googlenewsNext
ठळक मुद्दे दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांना वंदन करून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवातप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर- शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर राज्याचा कारभार करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील बुधवारी येथे दिले. शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या नागपुरात निघणाºया टप्प्यात त्यांनी वंचितांसाठी काम करणार व त्यांना न्याय देणार असा निर्धारही व्यक्त केला.
राष्ट्रवादीतील नेतेमंडळी व कार्यकर्ते भाजपात जात असले तरी, भाजपाने गेली काही वर्षे निवडणूक लढवण्याचेच काम केले आहे. मात्र भाजपातील काही जण त्यामुळे दुखावले गेले आहेत. त्यांची नावे योग्य वेळी जाहीर केली जातील असे ते पुढे म्हणाले. आघाडीत जागावाटप बाबत चर्चा सुरु असून ज्या उमेदवारांत निवडणून येण्याची क्षमता आहे अशांना उमेदवारी देण्यात येईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासमोर खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गडकिल्ल्यांबाबत लढा कायम ठेवणार
गड किल्यांविषयी वाणिज्यिक वापराचा निर्णय मागे घेतल्याचा शासनादेश जो पर्यंत सरकार काढत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले. गड किल्यांविषयी सरकारने घेतलेला निर्णय दुर्देवीअसून याप्रकरणी सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला... तसेच 'ब' प्रवर्गात नेमके कोण कोणते किल्ले व ऐतिहासिक स्थळे येतात याचा खुलासा सरकारने करावा अशीही मागणी त्यांनी केली.

Web Title: We work on the path of Shahu, Phule, Ambedkar, Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.