शिथिल निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा बसणार फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 11:57 PM2021-06-07T23:57:29+5:302021-06-07T23:57:59+5:30

Weak restrictions and sluggish vaccinations शिथिल झालेले निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ६ जूनरोजी पाच हजाराच्या आत लसीकरण झाले.

Weak restrictions and sluggish vaccinations will hit! | शिथिल निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा बसणार फटका!

शिथिल निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा बसणार फटका!

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्व विदर्भात रविवारी पाच हजाराच्या घरात लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील कोरोना लसीकरणात १८ वर्षांवरील वयोगटातील सर्वांच्या लसीकरणासोबतच राज्य सरकारला दिलेल्या लसीकरणाच्या २५ टक्क्यांची जबाबदारी केंद्र सरकारने स्वत:कडे घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु तूर्तास शिथिल झालेले निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ६ जूनरोजी पाच हजाराच्या आत लसीकरण झाले.

कोरोनाचा पहिल्या लाटेचा कहर ओसरताच १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली. सुरुवातीला एकट्या नागपूर जिल्ह्यात रोज साधारण १५ ते २० हजारदरम्यान लसीकरण होत होते. परंतु नंतर मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होताच खासगी हॉस्पिटलमधील केंद्र बंद करण्यात आले. १२ दिवसातच १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरणही थांबविण्यात आल्याने या मोहिमेलाच ब्रेक लागला. रविवारी ६ मे रोजी तर पूर्व विदर्भातील नागपुरात २३३०, भंडाऱ्यात १०४२, चंद्रपूरमध्ये ८०, गडचिरोली जिल्ह्यात शून्य, गोंदिया जिल्ह्यात ५२९, तर वर्धा जिल्ह्यात ९५० असे एकूण ४९३१ लोकांचेच लसीकरण झाले.

नागपुरात आतापर्यंत केवळ १२,३९,१२१ लोकांना डोस

४२ लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ९,६४,९६५ लाभार्थ्यांना पहिला, तर २,७४,१५६ लोकांना दुसरा डोस देण्यात आला. एकूण १२,३९,१२१ लोकांना डोस देण्यात आले. जवळपास २९ लाखांवर लोक अद्याप लसीकरणाच्या प्रतीक्षेत असताना रोज तीन ते चार हजाराच्या घरात लसीकरण सुरू असल्याने लोकांमध्ये संताप आहे.

 भंडाऱ्यात रोज दीड हजार लोकांचे लसीकरण

जानेवारी ते ६ जून यादरम्यान भंडारा जिल्ह्यात १,९८,६८५ लोकांना पहिला डोस, तर ७४,९४८ लोकांना दुसरा डोस देण्यात आला. दोन्ही मिळून २,७३,६३३ लोकांचे लसीकरण केले आहे. जवळपास १२ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात सध्या रोज दीड ते दोन हजार लोकांना लस दिली जात आहे.

 चंद्रपूरमध्ये ३,७८,०७३ लोकांना दिली लस

चंद्रपूर जिल्ह्यातही लसीकरणाचा वेग संथ असून रविवारी तर १०० च्या आत लोकांचे लसीकरण झाले. मागील पाच महिन्यात ३०८७३२ लोकांना पहिला डोस, तर ६९३४१ लोकांना दुसरा डोस असे एकूण ३,७८,०७३ लोकांचेच लसीकरण होऊ शकले.

 गडचिरोली जिल्ह्यात दुसरा डोस घेण्याऱ्यांची संख्या कमी

गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत १६२२९५ लोकांनी डोस घेतला. यात पहिला डोस घेणाऱ्या लोकांची संख्या १२६३३६ असून त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० टक्केही नाही. आतापर्यंत ३५९५९ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. रविवारी या जिल्ह्यात लसीकरणच झाले नाही.

गोंदियामध्ये २७१६९५ लोकांचे लसीकरण

गोंदिया जिल्ह्यामध्ये २०६१३७ लोकांनी पहिला डोस, तर ६५४५८ लोकांनी दुसरा डोस असे एकूण २७,१६९५ लाेकांचे लसीकरण झाले. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता, संपूर्ण लसीकरणाला आणखी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

 वर्धा जिल्ह्यात ५८,९८६ लोकांनी घेतला दुसरा डोस

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत २९४४०६ लोकांना दोन्ही डोस देण्यात आले. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २३५४२०, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५८९८६ आहे.

Web Title: Weak restrictions and sluggish vaccinations will hit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.