कमजोर प्रतिकारक्षमता आणि उपचारातील दिरंगाईने वाढला मृत्यूदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:50+5:302021-04-01T04:08:50+5:30
नागपूर : कोराेना संक्रमित आणि संकमणातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा होत असल्याचे प्रकार हृदय आणि फुफ्फुस ...
नागपूर : कोराेना संक्रमित आणि संकमणातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा होत असल्याचे प्रकार हृदय आणि फुफ्फुस बंद पडत असल्याने मृत्यू वाढत आहेत. मात्र नागपुरात होणारे मृत्यू हे कमजोर प्रतिकार क्षमता व भीतीमुळे उपचारात होणारी दिरंगाई या कारणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मृत्यूंची टक्केेवारी ६० पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात रोज ५० ते ५५ मृत्यू होत आहेत. ८५ टक्के रुग्णांमध्ये संक्रमणाची कसलीही लक्षणे दिसत नसल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत आढळून आले आहे. मात्र ज्यांच्यामध्ये ही लक्षणे दिसत नाहीत, त्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आजारातून दुरुस्त झाल्यावर नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. ६ टक्के रुग्ण गंभीर होतात. हे विषाणू रक्तवाहिन्या, फुफ्फुस, हृदयाला नुकसान पोहचवतात. ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्याने शरीरावर विपरीत परिणाम पडतो. ‘लोकमत’ने शहरातील काही विशेषज्ञांसोबत चर्चा करून मृत्यूची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
...
मृत्यूची कारणे
- मधुमेह, रक्तदाबाची समस्या
- हृदय, फुफ्फुस व किडनीचे आजार
- उपचार करण्यात होत असलेला विलंब
- ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये असणारी कमी प्रतिकारक्षमता
- रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्याने हृदय व फुफ्फुस बंद पडण्याचे प्रकार
...
रक्त पातळ करण्याचे औषध : केवलिया
मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया म्हणाले, कोविड रुग्णांना रक्त पातळ होण्याचे औषध दिले जाते. विषाणू रक्रवाहिन्यात गेल्याने नुकसान करतात. यामुळे सतर्कता बाळगायला हवी.
लक्षणे नसणाऱ्यांनी सावध राहावे : जगताप
हृदयरोग विशेषज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, लक्षण नसणाऱ्यांमध्ये दीड महिन्यांनी क्लॉटिंग होणे दिसायला लागते. यामुळे हृदय, फुफ्फुस बंद पडणे असे प्रकार आढळतात. मात्र हे प्रमाण कमी आहे.
असा करतात परिणाम
मानवी शरीरातील फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन घेऊन कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडला जातो.
मात्र कोरोनामुळे तयार झालेल्या लहान लहान एअरसॅकमुळे त्यात पाणी जमा व्हायला लागते. त्यामुळे श्वास घेता येत नाही. परिणामत: ऑक्सिजन लावावा लागतो.