धर्मसंसदेतील संतांच्या आवाहनानुसार बजरंगी बाळगणार शस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:52 PM2017-12-01T22:52:24+5:302017-12-01T22:58:14+5:30

कर्नाटकमध्ये झालेल्या धर्मसंसदेत संतांनी केलेल्या आवाहनानुसार बजरंगदलातील प्रत्येक सदस्य शस्त्र बाळगणार आहे. बजरंगदलाच्या देशभर सुरू असलेल्या भरती अभियानात दोन लाख नव्याने बजरंगी जोडण्याचा संकल्प आहे.

The weapon that will keep Bajrangi as per the appeal of Saints in Dharmasansad | धर्मसंसदेतील संतांच्या आवाहनानुसार बजरंगी बाळगणार शस्त्र

धर्मसंसदेतील संतांच्या आवाहनानुसार बजरंगी बाळगणार शस्त्र

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात दोन लाख नवे बजरंगी जोडणारनागपुरात २५ हजाराचे लक्ष्य


आॅनलाईन लोकमत
नागपूर : कर्नाटकमध्ये झालेल्या धर्मसंसदेत संतांनी केलेल्या आवाहनानुसार बजरंगदलातील प्रत्येक सदस्य शस्त्र बाळगणार आहे. बजरंगदलाच्या देशभर सुरू असलेल्या भरती अभियानात दोन लाख नव्याने बजरंगी जोडण्याचा संकल्प आहे. नागपुरात १९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत भरती अभियान राबविण्यात येणार आहे. नागपुरात २५ हजारांचे लक्ष्य असून, अभियानानंतर धर्मरक्षणासाठी त्रिशूळ दीक्षा समारंभ होणार आहे. यात प्रत्येक बजरंगीला शस्त्राच्या रूपात त्रिशूळ देण्यात येणार आहे. संतांच्या आवाहनानुसार राम मंदिर आंदोलनाचे बिगुल पुन्हा फुंकण्याची शक्यता असल्याचे बजरंग दलाचे संयोजक मनीष मौर्य यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला प्रशांत तितरे, राजकुमार शर्मा, संकेत आंबेकर, मोहन दिकोंडवार, राजेश शुक्ला, जितु कुंदवानी, विशाल पुंज उपस्थित होते.

Web Title: The weapon that will keep Bajrangi as per the appeal of Saints in Dharmasansad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर