हिवाळी अधिवेशन २०२२; ‘पीपीई’ किट घालून मोर्चेकरांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 08:59 PM2022-12-19T20:59:45+5:302022-12-19T21:00:54+5:30
Nagpur News आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या मोर्चाने सोमवारी विधिमंडळावर धडक दिली. कोविड योद्धांना नोकरीत नियमित करा, ही मागणी मोर्चातून लावून धरली. ‘पीपीई’ किट घालून मोर्चात सहभागी झालेल्या आरोग्य सेवकांनी लक्ष वेधून घेतले.
नागपूर : कोरोनाच्या महामारीत मनुष्यबळ कमी पडले असताना आपल्या जीवाची पर्वा न करता सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कोविड योद्धांनी शासकीय व महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णसेवा दिली. परंतु, कोरोनाचे रुग्ण कमी होताच या योद्धांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले. याचा जाहीर निषेध व्यक्त करत आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या मोर्चाने सोमवारी विधिमंडळावर धडक दिली. कोविड योद्धांना नोकरीत नियमित करा, ही मागणी मोर्चातून लावून धरली. ‘पीपीई’ किट घालून मोर्चात सहभागी झालेल्या आरोग्य सेवकांनी लक्ष वेधून घेतले.
- नेतृत्व
मनोज यादव, जगनारायण गुप्ता, मोहम्मद ताजुद्दीन, दिलीप देशपांडे, राजेंद्र साठे, डॉ. किरण जाधव, तौसिफ पटेल व सचिन मुनेश्वर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
- मुख्य मागण्या
: कोविड योद्धांना सरकारी आरोग्य व्यवस्थापनात कायमस्वरुपी सामावून घ्या.
: कोविड भत्ता व सानुग्रह अनुदान द्या.
: सर्व कोविड योद्धयांना त्यांच्या सेवेबद्दल प्रमाणपत्र द्या.
: मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करा.