हवामान विभागाचा अंदाज चुकतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:59+5:302021-09-04T04:12:59+5:30
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात ७ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. ...
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात ७ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. मात्र मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकल्याचे दिसून आले. नागपूर, अमरावती सोडले तर विदर्भात कुठेही मुसळधार पाऊस झाला नाही. नागपुरात गुरुवारी दीड तास पाऊस झाला. परंतु हवामान खात्याने सकाळी साडेपर्यंत केवळ ०.५ मिमी पाऊस झाल्याचाच आकडा जारी केला.
६० ते ७० मिमीहून अधिक पावसाला मुसळधारच्या श्रेणीत ठेवण्यात येते. नागपुरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी पाऊस आला, मात्र रेकॉर्डवर त्याची नोंदच झाली नाही. पुढील एक ते दोन दिवसांत नागपुरात पाऊस येऊ शकतो.
नागपुरात सायंकाळीच पाऊस
नागपुरात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वातावरणाचा रंग बदलला व जोरदार पाऊस झाला. दिवसभर ऊन असल्याने कमाल तापमानात वाढ झाली व पारा ३३.९ अंशांवर पोहोचला.