चिनी उपकरणे आल्यानंतरच मिळाली हवामानाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 10:17 AM2020-07-09T10:17:25+5:302020-07-09T10:18:04+5:30
हवामान विभागाच्या मुख्यालयाने जोर दिल्यानंतर विशेष परवानगीसह एक अभियंता चिनी उपकरणे घेऊन कारने नागपुरात आला आणि रडार दुरुस्त केले. हे उपकरणे जास्त मोठ्या आकाराचे नाही, पण त्याला चीनमधून बोलवावे लागते.
वसीम कुरैशी
नागपूर : चीनसोबतच्या तणावाच्या परिस्थितीत चीनमधून एक उपकरण आणल्यानंतरच नागपूर विमानतळावर बसविलेल्या डॉप्लर रडारने काम करणे सुरू केले आहे. उड्डाणे बंद असताना ही समस्या आली नव्हती. परंतु हवामानासंबंधी तंतोतंत माहिती देण्यासाठी डॉप्लर रडारचे काम सुरू असणे आवश्यक आहे. मेच्या अखेरीस दिल्ली मुख्यालयातून नागपुरातील डॉप्लर रडारच्या समस्येबाबत विचारणा झाल्यानंतरच त्याचे निराकरण करण्यात आले.
हवामान विभागाने २०१२ मध्ये डॉप्लर रडार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसविला. ते चीनमधून खरेदी केले होते. त्याची रेंज कमाल ५०० किमीपर्यंत असून १५० ते २५० किमीची (क्लोज रेंट) तंतोतंत माहिती देतो. त्याच्या माध्यमातून ढगांची स्थिती, त्याची जाडी, त्यात असलेले पाण्याचे प्रमाण, किती वेळात जवळ येऊ शकतो, यामुळे पाऊस येणार वा नाही आदींची माहिती मिळते. विमानांच्या ये-जाच्या हिशेबाने सीबी क्लाऊडची माहिती या उपकरणाने मिळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये रडारवरील चेंडूसारख्या भागाच्या आत फिरणाऱ्या अॅन्टिनाचे काही उपकरण खराब झाले होते. त्यामुळे एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रडार फिरणे बंद होते. मेपर्यंत हवाई सेवा बंद असल्याने रडार स्थापन करणे आणि त्यांच्या देखरेख करणाऱ्या कंपनीचा अभियंता पोहोचला नव्हता. पण हवामान विभागाच्या मुख्यालयाने जोर दिल्यानंतर विशेष परवानगीसह एक अभियंता चिनी उपकरणे घेऊन कारने नागपुरात आला आणि रडार दुरुस्त केले. हे उपकरणे जास्त मोठ्या आकाराचे नाही, पण त्याला चीनमधून बोलवावे लागते.