राज्यातील विणकरांसाठी ‘बुनकर मित्र’ हेल्पलाईन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:31 PM2018-01-11T12:31:03+5:302018-01-11T12:31:51+5:30
राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विणकर मित्रांना सर्वंकष माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विणकर मित्रांना सर्वंकष माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहेत.
विणकरांचे हित जोपासणे, त्यांना सर्वतोपरी मदत करणे तसेच शासकीय योजनांची सर्वंकष माहिती देण्याकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. ही सेवा विणकरांना नि:शुल्क देण्यात येत आहे. १८००२०८९९८८ हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. विणकरांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे हातमाग विणकर त्यांचे उत्पादनाचा तपशील, उत्पादनाचा फोटो आदी माहिती अपलोड करू शकणार आहेत. हातमाग विणकरांनी शासनाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले यांनी केले आहे.