‘विवाद से विश्वास’ योजनेवर वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:15+5:302020-12-30T04:10:15+5:30
‘विवाद से विश्वास’ योजनेवर वेबिनार नागपूर : आयकर विभागाच्या वतीने नुकतीच अॅड. कपिल हिराणी यांच्या सहकार्याने विवाद से विश्वास ...
‘विवाद से विश्वास’ योजनेवर वेबिनार
नागपूर : आयकर विभागाच्या वतीने नुकतीच अॅड. कपिल हिराणी यांच्या सहकार्याने विवाद से विश्वास योजनेवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी आयकर आयुक्त राजेश रंजन प्रसाद होते. यावेळी आयकर विभागाचे संयुक्त आयकर उपायुक्त उपसेन बोरकर, अॅड. कपिल हिराणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेबिनारमध्ये विविध फोरममध्ये ज्या करदात्यांचे आयकर टॅक्स अपील प्रलंबीत आहे त्यांना ‘विवाद से विश्वास’ योजनेच्या विविध फायद्यांबाबत माहिती देण्यात आली. या योजनेचा उद्देश प्रलंबित कर वादाचा निपटारा करणे आहे. या योजनेत आयकराबाबतच्या वादात करदात्यांना केवळ वाद असलेला कर द्यावा लागतो. तर या करावरील व्याज, दंड आणि शिक्षा माफ करण्यात येते. जर वाद व्याज आणि दंडाशी संबंधित असल्यास करदात्याला वाद असलेले व्याज किंवा दंडाची केवळ २५ टक्के रक्कम द्यावी लागते. वेबिनारमध्ये वक्त्यांनी सर्वांना ३१ डिसेंबरपर्यंत वैध असलेल्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. (वा. प्र.)
.............