कोंढाळी येथे अहिंसा यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:55+5:302021-04-02T04:08:55+5:30
काेंढाळी : जैन श्वेतांबर महावीर परंपरेतील तेरापंथ धर्म संघाचे ११ वे उत्तराधिकारी आचार्य महाश्रमण यांच्या अहिंसा यात्रेचे नागपूर शहरातून ...
काेंढाळी : जैन श्वेतांबर महावीर परंपरेतील तेरापंथ धर्म संघाचे ११ वे उत्तराधिकारी आचार्य महाश्रमण यांच्या अहिंसा यात्रेचे नागपूर शहरातून काेंढाळी येथे गुरुवारी (दि. १) आगमन झाले. येथे या यात्रेतील भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांच्यासह नागरिकांनी आचार्य महाश्रमण यांचे पूजन करून स्वागत केले. आचार्य महाश्रमण यांच्यासमक्ष अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला. आचार्य महाश्रमण यांनी या अहिंसा यात्रेला ९ नाेव्हेंबर २०१४ राेजी दिल्ली येथील लाल किल्ला येथून प्रारंभ केला हाेता. ही यात्रा भारत, नेपाळ, भुतान हे तीन देश व भारतातील २० राज्यातून जात आहे. सद्भावना व नैतिकतेचा प्रचार-प्रसार करणे, व्यसनमुक्ती अभियानाची माहिती देणे हा या यात्रेमागचा मूळ उद्देश आहे, अशी माहिती आचार्य महाश्रमण यांनी दिली. या अहिंसा यात्रेत कोणत्याही जाती, वर्ग, संप्रदाय किंवा क्षेत्राचा व्यक्ती यात्रेत सहभागी होऊ शकतो. आचार्य महाश्रमण यांच्या नेतृत्वातील या अहिंसा यात्रेत ८०० पेक्षा अधिक साधू व साध्वी, ४० हजार तरुण, ६० हजार महिला कार्यकर्त्या, १० हजाराहून अधिक व्यावसायिक सहभागी झाले आहेत. ही यात्रा कोंढाळीहून कारंजा (घाडगे), अमरावती मार्गे इंदूर(मध्य प्रदेश)कडे रवाना झाली.