रामगिरीवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

By admin | Published: December 31, 2016 03:06 AM2016-12-31T03:06:08+5:302016-12-31T03:06:08+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय दिले आणि नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त केल्याबद्दल

Welcoming the Chief Minister at Ramgiris | रामगिरीवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

रामगिरीवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Next

ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय दिल्याबद्दल
व एनआयटी बरखास्त केल्याबद्दल मानले आभार
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय दिले आणि नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त केल्याबद्दल शुक्रवारी रामगिरी या शासकीय निवासस्थानी हजारो नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे, संदीप जोशी, बळवंत जिचकार, डॉ. कल्पना पांडे, नंदाताई जिचकार, मोहन मते, गोपाल बेहरे, गिरीश देशमुख, जयप्रकाश गुप्ता, विजय महतकर, विवेक तरासे, मीनाताई तिडके, कीर्ती अजमेरा, ओंकारेश्वर गुरव, रमेश चोपडे आदी पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मिळावे ही अनेक वर्षांपासून मागणी होती. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला स्वतंत्र मंत्रालय देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दिलेले आश्वासन पूर्ण केले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस म्हणाले की, मंत्रालय निर्माण करणे ही पहिली पायरी असून या मंत्रालयाचा विकास करुन ओबीसीतील सर्व घटकांपर्यंत विकास पोहचविण्याचे काम या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात येईल. नागपूर सुधार प्रन्यास संदर्भातही अनेकांनी आश्वासने दिलीत. परंतु कुणीही एनआयटी बरखास्त केली नाही. नागपूर शहरातील जनतेच्या अपेक्षेनुसार एकाच शहरात दोन विकास संस्था नकोत, आता नागपूर शहरासाठी मेट्रो रिजन अथॉरिटी तयार झाली आहे. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करून विकासाची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची राहणार आहे. बाहेरचा विकास मेट्रो रिजन करणार असल्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सांगितले. आ. सुधाकर कोहळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे पुष्पहार घालून तसेच पेढा भरवून स्वागत केले. तसेच ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे यांनीही ओबीसीसाठी मंत्रालय स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Welcoming the Chief Minister at Ramgiris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.