प्रसिद्ध सर्जन डॉ. अरविंद जोगळेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:56 AM2019-02-21T00:56:48+5:302019-02-21T00:57:53+5:30

शहरातील तज्ज्ञ सर्जन भगवाघर ले-आऊट येथील रहिवासी डॉ. अरविंद महादेव जोगळेकर यांचे बुधवारी राजस्थानमधील भरतपूर येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल.

The well known surgeon Dr. Arvind Joglekar dies | प्रसिद्ध सर्जन डॉ. अरविंद जोगळेकर यांचे निधन

प्रसिद्ध सर्जन डॉ. अरविंद जोगळेकर यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील पहिल्या किडनी ट्रान्सप्लान्टमध्ये महत्त्वाची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तज्ज्ञ सर्जन भगवाघर ले-आऊट येथील रहिवासी डॉ. अरविंद महादेव जोगळेकर यांचे बुधवारी राजस्थानमधील भरतपूर येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पत्नी डॉ. वृंदा, दोन मुली मंजिरी देशपांडे आणि डॉ. केतकी जोगळेकर मांगरकर व बराच मोठा आप्त परिवार आहे. सर्जरीत एमएस केल्यानंतर ते मेयोत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अतिशय शांत आणि जादुई सर्जिकल बोटांनी कोणतेही कठीण ऑपरेशन सहजपणे साध्य करण्याची हातोटी त्यांच्यात होती. उत्तम चित्रकार, गायक, पक्षीदर्शन, प्रवास, वाचनाची आवड त्यांना होती. हेमलकसा येथील सर्जिकल कॅ म्पमध्ये अनेक रुग्णांच्या कठीण शस्त्रक्रिया करुन त्यांनी जीवनदान दिले आहे. नागपुरातील पहिल्या किडनी ट्रान्सप्लान्टमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

Web Title: The well known surgeon Dr. Arvind Joglekar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.