नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियाला गेले; चोरट्याने रोख रक्कम, दागिने केले लंपास

By दयानंद पाईकराव | Published: February 14, 2024 05:53 PM2024-02-14T17:53:12+5:302024-02-14T17:54:06+5:30

सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली घटना

Went to Gondia for a relative's wedding; The thief looted cash and jewellery | नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियाला गेले; चोरट्याने रोख रक्कम, दागिने केले लंपास

नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियाला गेले; चोरट्याने रोख रक्कम, दागिने केले लंपास

दयानंद पाईकराव, नागपूर: घराला कुलुप लाऊन कुटुंबीयांसह नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदिया येथे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील सोन्याचे दागीने व रोख असा एकुण १.८१ लाखांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० फेब्रवारी ते १३ फेब्रवारीला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

सुनिल रक्षारास गुप्ता (२६, रा. अड्याळी रोड, आऊटर रिंग रोड, नागपूर) हे आपल्या घराला कुलुप लाऊन नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियाला गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने त्यांच्या बेडरुममधील आलमारीतील सोन्याचे दागीने व रोख ५५ हजार असा एकुण १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Went to Gondia for a relative's wedding; The thief looted cash and jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.