कुटुंबासह मुंबईला गेले, चोरट्याने रोख, दागीने नेले

By दयानंद पाईकराव | Published: June 25, 2023 01:14 PM2023-06-25T13:14:59+5:302023-06-25T13:15:21+5:30

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

went to mumbai with family thief took cash jewels | कुटुंबासह मुंबईला गेले, चोरट्याने रोख, दागीने नेले

कुटुंबासह मुंबईला गेले, चोरट्याने रोख, दागीने नेले

googlenewsNext

दयानंद पाईकराव, नागपूर : घराला कुलुप लाऊन कुटुंबासह मुंबईला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील ८७ हजार रुपये किमतीचे दागीने व रोख रक्कम अज्ञात आरोपीने पळविल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल सत्तार अब्दुल अजीज अंसारी (वय ४७, रा. ताजनगर, टेका) यांच्या घरी वरच्या माळ्यावर राहणारे त्यांचे लहान भाऊ गफ्फार अंसारी अजीज अंसारी हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह मुंबईला गेले होते.

अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने घरातील सोन्याचे दागीने, मोबाईल व रोख १० हजार असा एकुण ८७ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: went to mumbai with family thief took cash jewels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.