नातीच्या वाढदिवसासाठी पुण्याला गेले अन् चोरट्यांनी ४.३४ लाख उडवले

By योगेश पांडे | Published: November 22, 2023 04:54 PM2023-11-22T16:54:21+5:302023-11-22T16:55:10+5:30

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Went to Pune for grandson's birthday and thieves stole 4.34 lakhs | नातीच्या वाढदिवसासाठी पुण्याला गेले अन् चोरट्यांनी ४.३४ लाख उडवले

नातीच्या वाढदिवसासाठी पुण्याला गेले अन् चोरट्यांनी ४.३४ लाख उडवले

नागपूर : नातीच्या वाढदिवसासाठी पुण्याला गेलेल्या एका पेन्शनरकडे चोरट्यांनी घरफोडी केली व ४.३४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

गजानन महादेवराव चव्हाण (६३, अमरज्योती नगर, नारा रोड, भीम चौक) हे महाजेनकोतील निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या नातीच्या वाढदिवस असल्याने ते १९ नोव्हेंबर रोजी रात्री पुण्याला गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व चोरी केली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पुतण्याला २१ नोव्हेंबर रोजी ही बाब लक्षात आली. त्याने त्यांना व पोलिसांना फोन करून माहिती दिली. चव्हाण लगेच नागपुरात परतले व पाहणी केली असता चोरट्यांनी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख १.६८ लाख असा एकूण ४.३४ लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Went to Pune for grandson's birthday and thieves stole 4.34 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.