कार्यक्रमाला गेले, चोरट्याने १.४० लाखांचे दागीने नेले
By दयानंद पाईकराव | Updated: October 28, 2023 14:30 IST2023-10-28T14:30:15+5:302023-10-28T14:30:57+5:30
घराला कुलुप लाऊन कार्यक्रमासाठी रविनगर येथे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १.४० लाखांचे दागीने अज्ञात आरोपीने चोरून नेले.

कार्यक्रमाला गेले, चोरट्याने १.४० लाखांचे दागीने नेले
नागपूर : घराला कुलुप लाऊन कार्यक्रमासाठी रविनगर येथे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १.४० लाखांचे दागीने अज्ञात आरोपीने चोरून नेले. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी २६ ऑक्टोबरला रात्री १०.३० ते शुक्रवारी २७ ऑक्टोबरच्या रात्री २.३० दरम्यान घडली.
अवजित संतोष मिश्रा (य ३७, रा. मुकुंद जिचकार यांच्या घरी किरायाने एनआयटी गार्डनसमोर श्रीनगर) हे आपल्या घराच्या मुख्य दाराला कुलुप लाऊन रविनगर येथे कार्यक्रमासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा कुलुप कोंडा तोडून आत प्रवेश केला.
आरोपीने घरातील लाकडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने किंमत १.४० लाख चोरुन नेले. मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.