ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:38+5:302021-08-14T04:11:38+5:30

२०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले, तर थोडा दिलासा आयपीसीसीचा इशारा : भाग-३ श्रीमंत माने/निशांत वानखेडे नागपूर : जगभरातील ...

Were the return ropes cut off from global warming? | ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

googlenewsNext

२०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले, तर थोडा दिलासा

आयपीसीसीचा इशारा : भाग-३

श्रीमंत माने/निशांत वानखेडे

नागपूर : जगभरातील प्रत्येकाला धडकी भरविणाऱ्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) अहवालाने जग जागे झाले व कार्बन डाय ऑक्साइडसह अन्य हरितवायूंचे उत्सर्जन थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली तरी पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी होईल का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, परतीचे दोर कापले गेले आहेत. पुढची तीस वर्षे तापमान वाढतच जाईल. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल.

अतिउष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, समुद्रांच्या पातळीत धोकादायक वाढ, दीर्घकाळाचे दुष्काळ किंवा हिमशिखरांचे वितळणे हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता वारंवार दिसू लागले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिका व कॅनडा हे देश अतिउष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाले. भारत, चीन, जर्मनीत महापुरांनी थैमान घातले. सायबेरिया, तुर्की, ग्रीसमध्ये जंगलाला भयंकर वणवा लागला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हिमालयामध्ये भूस्खलन, ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या साेमवारी जारी करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी अहवालात हवामानबदल किंवा तापमानवाढीचे जे परिणाम नोंदविले गेले आहेत, ते हेच आहेत आणि नजीकच्या भविष्यकाळात या घटना कमी होण्याची शक्यता नाही.

(समाप्त)

----------------------

शंभर टक्के प्रयत्न केले, तर दोन दशांशांचा दिलासा

* चार हजार पानांच्या आयपीसीसी अहवालाचा सार हाच आहे, की औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या कालखंडाचा विचार करता आताच पृथ्वीचे तापमान १.१ अंश सेल्शिअसने वाढले आहे.

* २०१५ चा पॅरिस करार गंभीरपणे घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे निघून गेली. आता या सहाव्या अहवालानंतर कडक पावले उचलली, तर २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.६ अंश सेल्शिअसइतकी वाढ होईल.

* एकविसाव्या शतकाच्या मध्यावर हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आणले तर ही वाढ रोखता येईल; परंतु कार्बन जाळायला, भूगर्भातील इंधन काढायला सुरुवात झाली त्या औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या टप्प्यावर कधीच पोहोचता येणार नाही. फारतर एकविसाव्या शतकाच्या अखेरीस तापमानातील वाढ १.४ अंश सेल्शिअसपर्यंत कमी होईल.

----------------------

असे मानले जाते की, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत येथील जीवसृष्टी पाच वेळा नष्ट झाली आहे. यापैकी डायनाेसार नामशेष हाेण्याचे उदाहरण सर्वांना परिचित आहे. आता सहाव्यांदा जीवसृष्टी नष्ट हाेण्यासाठी माणूसच जबाबदार असेल. हे सुंदर जग वाचविण्यासाठी आपल्या शेवटच्याच पिढीला प्रयत्न करावे लागतील; अन्यथा विनाश कुणीच राेखू शकणार नाही.

- भगवान केसभट, वातावरण फाउंडेशन, मुंबई

Web Title: Were the return ropes cut off from global warming?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.