परिचारिका विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:11 PM2020-09-21T22:11:21+5:302020-09-21T22:14:32+5:30

कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासकीय परिचारिका महाविद्यालय व अन्य परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेसाठी रुजू होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना स्मरणपत्र देऊन वारंवार कारवाईची धमकी देण्यात येत असून शैक्षणिक नुकसानाची भीती दाखवली जात असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे लावण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कुठलीही पावले उचललेली नाही. याविरोधात अभाविपतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

What about the safety of nursing students? | परिचारिका विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय?

परिचारिका विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय?

Next
ठळक मुद्दे अभाविपचा सवाल : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासकीय परिचारिका महाविद्यालय व अन्य परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेसाठी रुजू होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना स्मरणपत्र देऊन वारंवार कारवाईची धमकी देण्यात येत असून शैक्षणिक नुकसानाची भीती दाखवली जात असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे लावण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कुठलीही पावले उचललेली नाही. याविरोधात अभाविपतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
चोवीस दिवस लोटूनसुद्धा विद्यार्थांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी प्रशासनातर्फे घेतल्या जात नाही. जिल्हाधिकारी नागपूर यांनी १० सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनावरून मौखिक आश्वासन दिले त्यामुळे विद्यार्थी सेवेकरिता रुजू झाले. सेवेला आज ११ दिवस पूर्ण झाले, तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कुठल्याही बाबींवर विचार करण्यात आला नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आल्याचे अभाविपतर्फे सांगण्यात आले.
कोरोना रुग्णांच्या सेवासाठी नर्सिंगच्या ज्या विद्यार्थ्यांना लावण्यात येणार आहे, त्यांना विमा कवच लागू करण्यात यावे. संबंधित विद्यार्थ्यांना सेवा वेतन देण्यात यावे, विद्यार्थ्यांनी दिलेल्या सेवेचे तास क्लिनिकल्समध्ये मोजण्यात यावे. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसणाºया विद्यार्थ्यांना सेवेतून सूट देण्यात यावी. विद्यार्थ्यांना वसतिगृहात नि:शुल्क जेवणाची व्यवस्था देण्यात यावी. तसेच सेवेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाने संक्रमित झाला तर त्याच्यासाठी परीक्षेची वेगळी योजना असावी अशा मागण्या अभाविपतर्फे करण्यात आल्या. तर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागपूर महानगर सहमंत्री समर्थ रागीट यांनी दिला. यावेळी महानगर सहमंत्री करण खंडाळे, ईश्वर रेवणशेटे व शंतनू झाडे, प्रियंका वैद्य, अंजली बावनकर, धनश्री कावरे, यश घुपे प्रामुख्याने उपस्थित होते .

Web Title: What about the safety of nursing students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.