-तर शासनाच्या मदतीने होणाऱ्या संमेलनाचा फायदा काय? संमेलनाध्यक्ष किशोर सानप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:49 AM2018-12-30T01:49:59+5:302018-12-30T01:52:32+5:30
साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.
पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दीक्षाभूमीजवळील बी.आर.मुंडले शाळेच्या प्लॅटिनम सभागृहात करण्यात आले आहे. शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक व समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, निखिल मुंडले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विष्णू मनोहर, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, उपाध्यक्ष विजया ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना नंदा जिचकार म्हणाल्या की, समाजाचा समतोल राखण्याचे काम साहित्यात आहे. नवीन पिढीला साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीवर माझा आक्षेप असून मुलांना प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच दिले पाहिजे, असे झाल्यास साहित्यबद्दल नव्या पिढीमध्ये गोडी निर्माण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. उपाध्याय म्हणाले की, साहित्यात माणसाचे मन वळविण्याची शक्ती आहे. जी गोष्ट काठीने होऊ शकत नाही, ती उपदेशाने झाल्याची अनुभूती मला कारागृहामध्ये काम करताना आली. जिथे साहित्याची चर्चा होते, तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते. साहित्यात दैवी ताकद आहे. माणसाचे टेन्शन घालविण्यास गोळीपेक्षा साहित्य जास्त असरदार आहे. कायदा आणि साहित्य हातात हात घालून चालल्यास समाज आणि मनाचे परिवर्तन होऊ शकते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना विष्णू मनोहर म्हणाले की, चांगले संगीत, नाटक, साहित्य आणि भोजन असेल तर कुठलाही सोहळा आनंददायी ठरतो. राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात हा योग आला आहे.