नागपुरातील महापालिकेच्या बंद शाळेत सुरू काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:11 PM2019-02-27T23:11:42+5:302019-02-27T23:12:37+5:30

महापालिकेने गेल्या काही वर्षात स्वत:च्या ३४ शाळा बंद केल्या आहे. यातील काही शाळांच्या इमारती आजही आहेत. या इमारतीतील शाळा बंद पडल्या असल्यामुळे इमारतीचा उपयोग गुरांच्या गोठ्यासाठी, भंगार साठविण्यासाठी, ठेकेदारांच्या मजुरांना राहण्यासाठी, पार्किंगसाठी, समाजभवन म्हणून उपयोग होत आहे. विशेष म्हणजे शाळांच्या या मोठमोठ्या इमारतीकडे कुणाचेही लक्ष नाही. काही इमारती असामाजिक तत्त्वाचे अड्डे बनल्या आहेत. हुक्का पार्लर इमारतीमध्ये सुरू आहे. बंद पडलेल्या शाळेच्या संदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने बंद पडलेल्या शाळांची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या शाळांचे निरीक्षण केले असता, हे सर्व चित्र बघून मनपाच्या शाळांमध्ये सुरू काय, असा सवालच त्यांनी केला.

What is going on in closure municipal school in Nagpur? | नागपुरातील महापालिकेच्या बंद शाळेत सुरू काय?

नागपुरातील महापालिकेच्या बंद शाळेत सुरू काय?

googlenewsNext
ठळक मुद्देपरिसरातील लोकांचे अतिक्रमण : गुरांचा गोठा : ठेकेदाराचे अतिक्रमण : भंगाराचे गोदाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने गेल्या काही वर्षात स्वत:च्या ३४ शाळा बंद केल्या आहे. यातील काही शाळांच्या इमारती आजही आहेत. या इमारतीतील शाळा बंद पडल्या असल्यामुळे इमारतीचा उपयोग गुरांच्या गोठ्यासाठी, भंगार साठविण्यासाठी, ठेकेदारांच्या मजुरांना राहण्यासाठी, पार्किंगसाठी, समाजभवन म्हणून उपयोग होत आहे. विशेष म्हणजे शाळांच्या या मोठमोठ्या इमारतीकडे कुणाचेही लक्ष नाही. काही इमारती असामाजिक तत्त्वाचे अड्डे बनल्या आहेत. हुक्का पार्लर इमारतीमध्ये सुरू आहे. बंद पडलेल्या शाळेच्या संदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने बंद पडलेल्या शाळांची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या शाळांचे निरीक्षण केले असता, हे सर्व चित्र बघून मनपाच्या शाळांमध्ये सुरू काय, असा सवालच त्यांनी केला.
मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत अखिल भारतीय दुर्बल समाज विकास संसाधन संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गोळीबार चौकातील नेताजी सुभाष चंद्र बोस शाळेत त्यांनी भेट दिली असता. येथे केवळ चौथा वर्ग होता. त्यातही चारच विद्यार्थी होते. एक शिक्षिका होती. शाळेची पुरती दुरावस्था झालेली आढळली. जागनाथ बुधवारी येथील बंद पडलेली मराठी कन्या शाळेत जनावरांचा गोठा आढळला. याच इमारतीत ठेकेदाराने कब्जा करून त्याच्या मजुरासाठी वास्तव्य केले होते. हे मजूर ठेकेदाराला पैसेही देत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. बंगाली पंजा येथील २००४ पासून बंद पडलेल्या हिंदी उच्च प्राथमिक शाळेत डेकोरेशनचे साहित्य, परिसरातील लोकांच्या वाहनांची पार्किंग व सामुहिक कार्यासाठी इमारतीचा उपयोग होत असल्याचे आढळले.
गरोबा मैदानच्या शाळेत हुक्का पार्लर
गरोबा मैदान मराठी प्रा. शाळेतील फळ्यावर हुक्का पार्लरचा दर लिहलेला आहे. त्यामुळे बंद पडलेल्या या इमारतीत असामाजिक तत्त्वांचा अड्डा असल्याचे निदर्शनास आले. या इमारतीत विद्युत यंत्रणा लागलेली आहे. मात्र शालेय साहित्य भंगाराच्या अवस्थेत पडलेले आहे. मस्कासाथ येथील मराठी मुलींच्या शाळेत परिसरातील लोकांनी कब्जा केला आहे. तिथे टालवाल्यांचे लाकूड व भंगारवाल्यांचे साहित्य पडलेले आहे.
इमारतीचा दुरुपयोग
बंद पडलेल्या शाळांच्या वर्गखोल्या डम्पिंग यार्ड बनल्या आहेत. असामाजिक तत्त्वांनी तिथे अड्डे बनविले आहे. इमारतीचा दुरुपयोग होत आहे. शाळा डम्पिंग यार्ड म्हणून उपयोगात आणल्या जात आहे. सर्वत्र घाण, कचरा, वर्गखोल्यांमध्ये भंगार पडलेल्या टेबल-खुर्च्या असतानाही याकडे कुणाचेही लक्ष नाही. मनपाच्या स्वत:च्या असलेल्या या इमारतीचा वापरसुद्धा केलेला नाही. उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे याची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही अवस्था मनपाच्या निदर्शनास आली आहे.
बंद पडलेल्या शाळेच्या इमारतीचा वापर व्हावा
मनपाने शाळा बंद करून या इमारती भंगारासारख्या सोडल्या आहेत. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे व इंग्रजी माध्यमाच्या अट्टाहासापोटी मनपाच्या शाळांची ही अवस्था झाली आहे. या मोठमोठ्या इमारतींची दुरुस्ती करून या इमारतीत पुन्हा अध्यापनाचे कार्य सुरू व्हावे, या भावनेतून अ.भा. दुर्बल समाज विकास संसाधन संस्थेने याचिका दाखल केली होती. बंद पडलेल्या या शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात, ही अपेक्षा आहे.
धीरज भिसीकर, सचिव, अ.भा. दुर्बल समाज विकास संसाधन संस्था

 

Web Title: What is going on in closure municipal school in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.